बाळापूर पं.स च्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा
मनरेगाच्या कामात घोळ;सहा लेखाधिकारी, शाखा अभियंता,सचिवाची एका वर्षांसाठी वेतनवाढ रोखली
Pankaj Deshmukh
2021-11-24
अकोला-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअतंर्गत (मनरेगा) बाळापूर तालुक्यात झालेल्या शेतरस्त्याच्या कामातील घोळप्रकरणी सहाय्यक लेखाधिकारी, शाखा अभियंता, सचिवाची एका वर्षांची वेतनवाढ रोखण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्याने अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शेतकऱ्यांना शेतमालवाहतूक करण्यासाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता असते ग्रामिण भागांत अनेक शेतरस्त्याची प्रचंड दुरवस्था असल्याने मनरेगाच्या अर्थात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विविध कामे करण्यात येतात.आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे काम कंत्राटदाराला देण्यात येते. मात्र बाळापूर तालुक्यातील कामांबाबत प्रहारचे उपजिल्हाप्रमुख अरविंद पाटील यांनी एप्रिल महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सदर प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. याबाबतचा चौकशी अहवालाही जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावर कारवाईचा बडगा उचलल्याने इतर विभागात कामचुकार पणा व आयता डल्ला मारणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
Post Views: 197