जागेच्या वादातून परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल!


 विश्वप्रभात  24 Apr 2024, 7:40 PM
   

अकोला : जागेच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन प्रकरण महाराणी पर्यंत पोहोचले रौंदळा येथे घडलेल्या या घटने प्रकरणी अकोट पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी  वरून नुकतेच दोन्ही गटाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत .

फिर्यादी अनुप सदानंद भारती (३५) रा. रौंदळा यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, फियादीच्या चुलत बहिणीकडून खुला प्लॉट विकत घेतला आहे. त्यामुळे शेजारी राहणारा नंदकिशोर भारती याची जिवार आली होती. तो फिर्यादीला प्लॉट विकत दे असे म्हणत होता. मात्र नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून १९ एप्रिल रोजी फिर्यादी प्लॉटजवळ गेला असता प्लॉटवर आरोपी नंदकिशोर भारती याचे गायवाड्याचा कुड सरकलेला दिसल्याने तो फिर्यादीने लोटला. त्यामुळे आरोपी नंदकिशोर विठ्ठल भारती (४०), प्रणव नंदकिशोर भारती (१८) दोन्ही रा. रौंदळा यांनी लोखंडी पाईपने फिर्यादीस मारहाण केली. दुखापतग्रस्तावर अकोटच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. अशा आशयाच्या रिपोर्टवरून २० एप्रिल रोजी तेल्हारा पो. स्टे. मध्ये नमूद दोन्ही

आरोपीविरुध्द भादंविच्या ३२४, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर महिला फिर्यादी आरती नंदकिशोर भारती (४०) रा. रौंदळा यांच्या तक्रारीनुसार, जनावरे गायवाड्यात येऊ नयेत म्हणून फिर्यादीने टिनशेड उभे केले असून, त्यामुळे आरोपी अनुप सदानंद भारती याने १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्यान गायवाड्यास लावलेले टिनशेड न सांगता लोटून पाडून टाकले. तसेच फिर्यादीच्या पतीचा गळा दाबून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. रिपोर्ट देऊन फिर्यादी घरी आली असता आरोपीने त्याचा बुट फेकून मारला. फिर्यादीच्या पतीला काठीने मारहाण करू लागला. फिर्यादी आवरण्यास गेली असता लोटपाट करून शिवीगाळ केली. फिर्यादीचे लहान मुलास थापडा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी नमूद आरोपी विरुध्द शनिवारी २० एप्रिल रोजी भादंविच्या कलम ४५२, ३२३,५०४, ५०६ कलमान्वये दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल अमोल सोळंके याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. 

    Post Views:  99


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व