साहित्यकणाच्या संमेलनाध्यक्षपदी सुरेश पाचकवडे यांची निवड...


 विश्वप्रभात  07 Jan 2026, 5:54 PM
   

मराठी साहित्य क्षेत्रात अग्रेसर असलेल्या साहित्यकणा फाऊंडेशन नाशिक च्या वतीने दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या साहित्य संमेलनाच्या यंदाच्या वर्षी अकोल्यातील नामवंत साहित्यिक सुरेश पाचकवडे यांची संमेलनाध्यपदी निवड झाली आहे. अलीकडेच त्यांना साहित्यकणा नाशिकचे अध्यक्ष मा. संजय गोराडे, सचिव मा. विलास पंचभाई यांनी निवडपत्र पाठवून कळविले आहे. साहित्य कणाचे हे अकरावे संमेलन दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी नाशिक येथे संपन्न होणार आहे.
सुरेश पाचकवडे यांनी या अगोदर शुभम बाल साहित्य संमेलन अकोला,  अंकुर मराठी साहित्य संमेलन मुर्तिजापूर,  सृजन साहित्य संमेलन नागपूर, कलाविष्कार साहित्य संमेलन मुर्तिजापूर आणि अक्षरक्रांती साहित्य संमेलन नागपूर इत्यादी संमेलनाध्यक्षपदं भुषविली आहेत. त्यांच्या कथा, कवितांची सहा पुस्तकं प्रकाशित असून त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सुरेश पाचकवडे यांच्या कवितेचा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश असून ते विदर्भ साहित्य संघ शाखा अकोला चे उपाध्यक्ष, जिल्हा मराठी भाषा समितीचे अशासकिय सदस्य, साद बहुउद्देशीय संस्थेचे कार्याध्यक्ष, लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाचे सल्लागार आहेत.

    Post Views:  14


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व