१० दिवसीय वसुंधरा कार्निवल संपन्न
श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर काँलेजमध्ये समर कॅम्प वसुंधरा कार्निवल 2022 उत्साहा
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
15 May 2022, 1:17 PM
नांदुरा : श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर काँलेजमध्ये समर कॅम्प वसुंधरा कार्निवल 2022 उत्साहात... याप्रसंगी आमदार व संस्था अध्यक्ष राजेशभाऊ एकडे हे उपस्थित होते, त्यांनी आर्ट आणि क्राफ्ट प्रदर्शनीचे उद्घाटन केले व मुलांनी व शिक्षकांनी तयार केलेल्या वस्तूंचे अवलोकन केले विद्यार्थ्यांना झाडे वाटप केली.
ह्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून झी टि. व्ही. हास्यसम्राट फेम माननीय किशोर बळी, गोपाल मापारी अकोला हे होते. याबरोबरचे आयोजन करण्यात आले होते. सरोदे यांनी आपले मधुर वाणी ने सर्वांचे मनोरंजन केले. तसेच विद्यार्थ्यांनी गाणी गायली व काही विद्यार्थ्यांनी संगीत वाद्ये वाजवली. त्यानंतर बक्षिस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. स्पर्धा व खेळ यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना
प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.असा हा दहा दिवसा पासून चाललेला समर कॅम्प खूप चांगल्या प्रकारे पार पडला. ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संचालन प्राचार्य श्री.विश्वास मापारी, संस्था संचालक श्री. रविंद्र सिंह ठाकूर श्री. संतोष ठाकुर, श्री. उमेश सुरडकर आणि इतर शिक्षकवृंद यांनी केले. वसुंधरा 2022 समर कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांचे विविध खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या. या समर कॅम्पचे मुख्य आकर्षण म्हणजे कॉमेडियन किशोर विजय बळी यांचा मिमिक्री शो हास्यबळी डॉट काँम. कॉमेडियन किशोर विजय बळी यांची कॉमेडी अँक्ट पाहून सगळे हसून लोटपोट झाले. खूप उत्कृष्ट प्रकारे कॉमेडी करून त्यांनी ह्या समर कॅम्प वसुंधरा कार्निवलची शोभा वाढवली.
ह्य अगोदर दिनांक ०५/०५/२०२२ रोजी समर कॅम्प वसुंधरा कार्निवल चे उ्घाटन करण्यात आले होते.. याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री अनिल घनोकार होते व प्राचार्य श्री.विश्वास मापारी, संस्था संचालक रविंद्र सिंह ठाकुर उपस्थित होते. समर कॅम्पच्या पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सुरवातीला श्री. पारखे यांनी विद्यार्थ्यांना योगा आणि कराटे याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी विर महाराणा प्रताप यांच्या जीवनचरीत्रावर ड्रामा आणि नृत्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचा वार्षिक अहवाल श्री विलास धोरण यांनी सादर केला.यावेळी. सदर कँपमध्ये छत्रपति शिवाजी महाराज याचा पोवाडा, मम्मी अँड मी, तसेच रंगोली आर्टिस्ट, क्ले आर्टिस्ट, व गिनिज बुक रेकॉर्ड होल्डर एस गोगा ह्यांचा मँजिक शो , स्पोर्ट डे, रेन डान्स, दहीहांडी, आनंदमेला, संगीत रजनी, आर्ट आणि क्राफ्ट प्रदर्शनी, माईम अँड ड्रामा, हाँरर शो, योगा व बालसंस्कार, श्री.शैलेश ठाकूर व श्री.क्षिरसागर यांचा स्वच्छतेसंबंधी ड्रामा, जंगली महाराजांवर नाटीका व अनेक वेगवेगळे डान्स प्रकार ई. भरगच्च कार्यक्रमानी परीपूर्ण होता. पालकांनी सर्व उपक्रमांना खूप चांगला प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाकरीता संपूर्ण एस जेम्स व जेसी ची टिम कार्यरत आहे . ह्यामध्ये सर्वश्री.धोरण, श्र प्रविन गिरी सर, श्री अमोल अवकाळे, पंकज गायकवाड, ढोले, क्षीरसागर, सौ. कविता मानकर,सौ. वनिता वडोदे, निकिता मांडवे, निकिता पांडव, सौ.अर्चना साठे,सौ. निकिता माहूरे, धनश्री मलिक, प्रगती डंबेलकर,शितल हिवरखेडे, सौ.पूजा गावंडे, सौ. अनिता इंगळे, सौ.ममता बावस्कार, सौ.दिशा डवंगे, कु. बाठे ,तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारी निलेश काजळे, रवि माहुरे , कल्पना राखोंडे, कविता ढवळे ह्यांचे विशेष सहकार्य होते.
Post Views: 311