एसटी महामंडळामधील साहित्यातून चक्क श्वानासाठी पिंजरा बनविणारा आगर व्यवस्थापक निलंबित
अकोला - रिसोड येथील बस आगार व्यवस्थापकाने चक्क एसटी महामंडळातील साहित्याचा वापर करीत श्वानासाठी पिंजरा बनविला. सदर प्रकरणाची वरिष्ठांकडे तक्रार प्राप्त झाल्याने ही बाब उघडकीस आली. २९ फेब्रुवारी रोजी अकोला येथील अधिकाऱ्यांनी सदर पिंजरा जप्त करुन सुरक्षा रक्षकाच्या ताब्यात देण्यात आला.
रिसोड येथील आगार व्यवस्थापक दादाराव दराडे यांनी आगारामधील कर्मचाऱ्यांकडून ड्यूटीच्या वेळात व महामंडळाच्या साहित्यातून स्वतःच्या श्वानाकरिता एक लोखंडी पिंजरा बनविला. सदर पिंजरा बसचालक पी.डी. बोराटे व आगारातील इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने २४फेब्रुवारी रोजी बस क्रमांक ५९४१ मध्ये टाकून आपल्या निवासस्थानी नेला. सदर प्रकाराची तक्रार एका नागरीकांनी मुख्य कार्यालयातील वरिष्ठांकडे केली. आगार व्यवस्थापकांनी आपल्या पाळीव श्वानासाठी पिंजरा बनवून एसटी महामंडळ पदाचा दुरुपयोग करून महामंडळाची हानी करून नियमाचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून अकोला येथील सहायक वाहतूक निरीक्षक बबलू पळसपगार व सुरक्षा रक्षक सुपरवायझर श्रीमती सरोदे यांनी रिसोड येथे भेट देऊन पाहणी केली.
यावेळी आगार व्यवस्थापकांच्या निवासस्थानाजवळ सदर पिंजरा आढळून आला. सदर पिंजरा त्यांनी सुरक्षा रक्षकाच्या ताब्यात दिला. व वरिष्ठ सुरक्षा अधिकारी यांनी अहवाल तयार करून उपमहाव्यवस्थापक यांच्याकडे सादर केला त्या अहवालावरून
श्री. दादाराव कारभारी दराडे, आगार व्यवस्थापक, रा.प. रिसोड आगार, अकोला विभाग. यांना उपमहाव्यवस्थापक, नियंत्रण समिती क्र.३, रा.प. नागपूर यांनी निलंबित केले व तसा आदेश त्यांना सुपुर्द करण्यात आला. अशा माहिती सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी दिली
Post Views: 166