राबवा आपला अधिकार होऊन जागृत मतदार दिव्यांग सोशल फाउंडेशनचा राष्ट्रीय उपक्रम


 विश्वप्रभात  15 Apr 2024, 4:58 PM
   

अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे आर.एल.टि.विज्ञान महाविद्यालय अकोला येथे मतदार साक्षरता अभियानाचे ब्रँड अँबेसिडर डॉ.विशाल कोरडे यांनी नवमतदारांना मार्गदर्शन केले.
दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान केंद्रावर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना सहकार्य  करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले.लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाची आवश्यकता, योग्य उमेदवाराची निवड,महिला मतदानाची टक्केवारी वाढणे ह्या विषयांवर चर्चा केली . महाविद्यालय परिसरात राबवा आपला अधिकार होऊन जागृत मतदार अशा उद्घोषणेसह नवमतदारांनी  मतदान करण्याची शपथ घेतली.प्राचार्य डॉ.विजय नानोटी यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व डॉ.विशाल कोरडे करित असणाऱ्या मतदार साक्षरता अभियानाचे कौतुक केले.कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य अनामिका देशपांडे, अस्मिता मिश्रा, सिद्धार्थ ओवे, गणेश सोळंके, प्रतिभा काटे यांनी सहकार्य केले.

    Post Views:  262


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व