लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, रुग्णहक्क संरक्षण समिती व समाजहित अभियान प्रतिष्ठान चा उपक्रम


निराधार कुटुंबा सोबत दीपावली साजरी करत दिला आधार!
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 Nov 2024, 9:55 AM
   

परभणी (प्रतिनिधी) पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारी व सोबतच सामाजिक कार्य  करणारी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ तसेच रुग्णांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारी सामाजिक संघटना रुग्ण हक्क संरक्षण समिती व समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संघटना समाजहित अभियान प्रतिष्ठान, दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेच्या वतीने समाजाची सामाजिक बांधिलकी जपत दीपावली भाऊबीज निमित्त एका निराधार, गरजू, विधवा महिलेला  साडी त्यांच्या 3 मुली व एका मुलाला कपडे व काही छोटे फटाके, मिठाई भेट देऊन  या कुटुंबियांना सोबत  दीपावली साजरी करण्यात आली आहे. 
     दीपावलीचा सन मोठया थाटामाटात संपूर्ण भारतात मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. दीपावली ला नवे नवे कपडे, फटाके, मिठाई, दीप लावून प्रत्यक कुटुंबीय दीपावली साजरी करत असतात. परंतु  समाजात असेही काही कुटुंबीय आहे त्यांच्या आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना एक वेळचे जेवण सुद्धा मिळने कठीण आहे. अशा कुटुंबियांचा सहारा बनून दीपावली भाऊबीज ची ओवाळणी म्हणून सदरील ताईसाहेब व त्यांच्या 4 मुलांना ही सर्व सामाजिक संघटनाच्या वर्गणी सहभागातून छोटीशी ओवाळणी भेट देऊन दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी डॉ. आंबेडकर नगर परभणी येथील लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा कार्यालय येथे दिवाळी साजरी करण्यात आली आहे. ही मदत केल्यामुळे या कुटुंबियांच्या वतीने सर्वच सामाजिक संघटनेचे आभार मानले. या कुटुंबीयास मदत करण्यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ तथा रुग्णहक्क संरक्षण समिती परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, मराठवाडा संघटन प्रमुख डिझिटल मीडिया वाजेद खान, परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष समाजहित अभियान प्रतिष्ठान चे प्रमोद अंभोरे, रुग्णहक्क संरक्षण समिती तथा मुस्लिम विकास परिषद चे परभणी जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, परभणी तालुकाध्यक्ष युसूफ बोगानी कच्ची, महिला संघटक वैशाली साळवे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मेहमूद खान, सेवा निवृत्त पी. एस.आय. तथा दलित पँथर चे परभणी जिल्हा अध्यक्ष संभाजी पंचागे, सामाजिक कार्यकर्ते युवा नेते यशवंत सोनवणे, रितेश साबळे, कैलास गरुड, शंकर बनसोडे, सिद्धार्थ शिंगारे, शेख इसाक, हरदीप सिंग बावरी, संदीप वायवळ, शेख कलीम आदींचा सहभाग होता. 
हा सामाजिम उपक्रम राबविण्यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे राष्ट्रीय तथा संस्थापक अध्यक्ष संजय जी देशमुख, महाराष्ट्र संघटन प्रसिद्धी प्रमुख भगीरथ बद्दर, रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष ऍड. सुभाष अंभोरे दूधगावकर, रुग्णहक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष ऍड. निलेश करमुडी आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

    Post Views:  224


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख