कापशी रोड येथे विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  17 Aug 2022, 9:27 PM
   

(मंगेश चऱ्हाटे) - कापशी : कापशी रोड भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जि प शाळा, महावितरण कंपनी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, आदी विविध  ठिकाणी वेगवेगळे  कार्यक्रम करुन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला .
कापशी रोड येथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या वतीने स्वातंत्र्यदिन  निमित्ताने ध्वजारोहण चा कार्यक्रम आयोजित करुन गावातील वरिष्ठ रहिवासी वासुदेव धुमाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले  यावेळी उपस्थित म्हणून कापशी रोड चे सरपंच अंबादास उमाळे, सेंट्रल बँक चे शाखा प्रबंधक प्रशांत अग्निहोत्री, तसेच बॅकेचे सुजीत वानखडे, श्रीपाद देशपांडे,विकास सोळंके, श्रीकृष्ण वडतकार, बाळवंत आमले, गजानन चतरकर, राजेश केवट, बाळू डिवरे आदी बॅकेचे ग्राहक उपस्थित होते.

    Post Views:  259


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व