कापशी येथील श्री इन्फोटेक येथे मनमानी कारभाराने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून ठेवले वंचित
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
01 Mar 2024, 8:36 AM
अकोला : तालुक्यातील कापशी रोड येथील ऑनलाईन परीक्षा सेंटर असलेले श्री इन्फोटेक येथे आज दि.२९ फेब्रूवारी सकाळी अंगणवाडी सेविका भरतीची आँनलाईन परिक्षा होती. परीक्षा देण्यासाठी अकोला येथील उन्नती राहुल जायभाये व माहेरचं नाव उन्नती उत्तम गंगावणे या दोन्ही दोन्ही नावाचे पुरावे असताना सुद्धा ऑनलाइन सेंटर वाल्यांनी त्यांना एकाच नावाचा पुरावा मागितला. तर त्यांनी ताबडतोब पार्किंग मध्ये लावलेल्या गाडीमधून पुरावा आणण्यासाठी गेले असता त्यांना पुन्हा परीक्षा ला बसू दिले नाही. अशाच प्रकारे अमरावती यवतमाळ जिल्ह्यातील अनेक अनेक परीक्षा देणाऱ्यांना ना परत करून परिक्षेपासून ठेवले.या वंचीत अन्याग्रस्तांनी ठेवलेल्यांनरीतसर तक्रार पातुर पोलीस स्टेशन कडे देण्यासाठी गेल्या असता पातुर पोलीस स्टेशन ठाणेदार किशोर शेळके यांनी त्यांच्या तक्रारी घेण्यास नकार दिला अशा या मनमानी प्रकारांनी अनेक विद्यार्थी अनेक परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. याकडे शासनाचे बिलकुलच लक्ष नाही असे दिसून येते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ज्यांना आज परीक्षा देण्यापासुन वंचीत राहिलेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळवून देण्याची मागणी करण्यात येत आहे .
Post Views: 281