कापडी पिशव्यांचा वापर करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  24 Jun 2022, 9:08 PM
   




अकोला :  जिल्ह्यात पर्यावरण संरक्षण राखण्याच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरीस व प्लास्टीक वापरास प्रतिबंध करण्यात आले आहे. प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्याचा वापराबाबत नागरिकांना प्रोत्साहित करावे. याकामी स्वयंसेवी संस्थानी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात प्लॉस्टीक उत्पादने व निर्मुलनाबाबत जिल्हा पर्यावरण समितीची बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, नगरप्रशासनचे सुप्रिया टवलारे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी  मनिष होळकर, बार्शिटाकळीचे मुख्याधिकारी एस.डी. ठोंबेमुर्तीजापूरचे गटविकास अधिकारी ए.व्ही. बांगर, बार्शीटाकळीचे कालीदास तापी, न.प. प्रशासनचे तहसिलदार बळवंत अरखराव आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, सिंगल युज प्लास्टिक व वस्तुंचे निर्मुलन करण्याकरीता संबंधीत यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. गाव पातळीवर तसेच नगरपालिका स्तरावर समिती तयार करुन नियमित सिंगल युज प्लास्टिक  वापराबाबत आढावा घ्यावा. गट विकास अधिकारी यांनी गाव पातळीवर सिंगल युज प्लास्टिक वापराबाबत जनजागृती करावी. तसेच  जिल्हा प्रशासकिय अधिकारी यांनी सिंगल युज प्लास्टिक बाबतची माहिती संबंधीत विभागांना कळवावी. शैक्षणीक संस्थांनी  विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती मोहीम राबवावी. तसेच अशासकिय संस्था व बचत गटामार्फत कापडी पिशव्या वापराबाबत नागरिकांना प्रोत्साहित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.  

    Post Views:  181


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व