समाजाचे नैराश्य दूर करण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख यांचे लोक विद्यापीठाचे तत्त्वज्ञान हे सर्वोत्तम शक्तीपीठ : डॉ मंगेश देशमुख, महासंचालक
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Dec 2023, 10:56 AM
गाडगे बाबा, निरक्षर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण ४था वर्ग, यांना परंपरागत विद्यापीठाच्या शिक्षणाची दरवाजे बंद आहेत म्हणून डॉ पंजाबराव देशमुख 1948ला ग्रेट ब्रिटन येथे जाऊन तेथील लोक शिक्षण पद्धती चा अभ्यास करून अमरावती येथे सन १९५०ला श्री शिवाजी लोक विद्यापीठ स्थापन केले, राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी उद्घाटन केले अश्या या तत्वज्ञान चे लोक विद्यापीठ चे महत्त्व पाहता आज अमरावती येथे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,तर नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ असे असून आज समाजातील नैराश्य दूर करणे साठी डॉ पंजाबराव देशमुख यावे लोक विद्यापीठ तत्वज्ञान हे सर्वोत्तम शक्तीपीठ आहे
आम्ही विदर्भातील देशमुख,पाटील,कुणबी,असे इत्यादी पैकी अनेकांना डॉ पंजाबराव देशमुख यांचे वैचारिक शक्ती पेक्षा आम्हाला कुणबी OBC साठी दाखले,पुरावे मिळालीत ,त्यांचे फोटो घरात,कार्यक्रम मध्ये आम्ही लाऊन धन्यवाद व्यक्त करतो,निवडून दिलेले लोक प्रतिनिधी आमदार,खासदार हे सुद्धा निवडून गेले नंतर विधान सभा,लोक सभा मध्ये डॉ भाऊसाहेब देशमुख यांचे मौलिक विचार गतिमान करताना दिसत नाहीत
मराठवाडा,जालना,अंतरवली सरवटे येथील मराठा योद्धा सन्मा मनोज जरंगे पाटील यांनी डॉ पंजाबराव देशमुख यांचे मौलिक विचारातून प्रेरणा स्त्रोत प्राप्त करून महाराष्ट्र राज्य सह देश्यात मराठा ही जात नाही,कुणबी ही जात आहे,आणि मराठा याना सरसकट कुणबी प्रमाणपत्र शासन यांनी द्यावे या साठी समाज चळवळ सुरू केली आहे.
भारत सरकार,कृषी मंत्रालय,नवी दिल्ली,यांचे कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा ATMA या सामाजिक संस्था सोबत छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ,अमरावती यांनी समन्वय करून अखिल भारतीय कुणबी,कुर्मी क्षत्रिय महासभा,यांचे माध्यमातून देशांचे २४ राज्यात डॉ पंजाबराव देशमुख यांचे लोक विद्यापीठ तत्वज्ञान लोकाभिमुख करण्यात यशस्वी ता प्राप्त केली आहे,
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती चे अध्यक्ष,माजी कृषी मंत्री सन्मा हर्षे वर्धन देशमुख,सन्मा दिलीपबाबु इंगोले,कोषाध्यक्ष,सन्मा अड.गजाननरावफुंडकर,उपाध्यक्ष,सन्मा भैय्यासाहेब पाटील,उपाध्यक्ष,सन्मा केशवराव मेतकर,उपाध्यक्ष,सन्मा हेमंत काळमेंघ,प्राचार्य केशवराव गावंडे,सन्मा सुरेशराव खोटरे,प्रा सुभाषराव बनसोड,डॉ महेंद्र ढोरे,सन्मा नरेश पाटील,सन्मा पुरुषोत्तम वायाल,डॉ अमोल महल्ले,सदस्य डॉ वि.गो.ठाकरे,सचिव इत्यादी मंडळी यांनी डॉ पंजाबराव देशमुख यांचे १२५वी जयंती निमित्याने संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रम याचे आयोजन सोबत,सन १९५९ला डॉ पंजाबराव देशमुख यानी नवी दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित केले होते त्याची प्रतिकृती डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय कृषी प्रदर्शन दिनाक २७डिसेंबर ते३०डिसेंबर २०२३यांचे भव्य दिव्य असे आयोजन श्री शिवाजी कृषी महाविद्यालय प्रक्षेत्र,मोर्शी रोड अमरावती येथे आयोजन केले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,भारतीय कृषक समाज,नवी दिल्ली,चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,डॉ सुभाष नलंगे ,प्रभारी सन्मा ज्योती ताई सुरसे,छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ,अमरावती चे संचालक विस्तार डॉ धोंडी भाऊ दातीर,आणि अन्य सामाजिक संस्था यांचे माध्यमातून दिनाक २७.डिसेंबर २३रोजी राहुरी जिल्हा अहमदनगर येथे जयंती साजरी होत असून,मराठा योद्धा सन्मा मनोज जरांगे पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत,नवी दिल्ली येथील सरदार वलाभ भाई पटेल लोक विद्यापीठ,अखिल भारतीय कुणबी कुर्मी क्षत्रिय महासभा,यांचे समन्वय यांनी दिनाक २७डिसेंबर २०२४ची जयंती तालकटोर इनडोअर स्टेडियम ,नवी दिल्ली येथे साजरी करण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र राज्य सह देशाचे विविध राज्यात केंद्र सरदार यांचे आत्मा चे समन्वय यांनी डॉ पंजाबराव देशमुख यांचे लोक विद्यापीठ तत्वज्ञान लोकाभिमुख होत असून समाजातील नैराश्य दूर करणे साठी अमरावती येथे शक्ती पीठ निर्माण करणे लोक विद्यापीठ धोरण आहे असे डॉ मंगेश देशमुख,महासंचालक लोक विद्यापीठ,अमरावती यांनी प्रसिध्दीस दिले आहे
Post Views: 107