जुनाट असाध्य रोगांवर नियंत्रण आणि प्रसन्न,आनंदी जीवनासाठी निसर्गोपचार.... डॉ.मंगेश देशमुख


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  10 Feb 2024, 11:58 AM
   

जुनाट अनेक असाध्य रोग निर्मूलनासह आनंदी,प्रसन्न,उत्साही,नवचैतन्य मय जीवन जगण्यासाठी कृषी निसर्गोपचार व आहार थेरपी एक वरदान आहे असे मत डॉ मंगेश देशमुख,महासंचालक,लोक विद्यापीठ यांनी व्यक्त केले आहे.
आजच्या युगात,काळात,सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असेल,तर निरोगी शरीर असलेला,प्रचंड साधन संपतीवाला अजिबात नाही.....या साठी आवश्यक आहे,नैसर्गिक उपचार पद्धती.सातत्याने आपले परिसरात असलेले भटके कुत्रे,मांजरी, माकड हे आजारी पडलेत की कोणत्या सुपर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी जातात,याचा सखोल अभ्यास केला तर,तर असे लक्षात येते की,ते आजारी पडलेत की स्वतः हून निसर्गाचे सानिध्यात जातात आणि गवत,परिसरातील 
वनौषधी याची पाने सेवन करताना दिसतात.बिनधास्त खातात आणि तंदुरूस्त होतात.जीवनाचा आनंद घेत परत आपल्या संपर्कामध्ये येतात. ही बाब सर्वांना सुपरिचित आहे.
        याच तत्वज्ञानावर आधारित महाराष्ट्र शासन कृषी विभाग मध्ये सन १९७९ पासून कार्यरत असलेले डॉ मंगेश देशमुख यानी डॉ प्रशांत मुळीक,BAMS,MD (A MED)M SC Food&Nutrition,MBA यांचे सह अनेक मान्यवर यांच्या संपर्कात येऊन ,कृषी निसर्गोपचार व आहार थेरपी या नैसर्गिक,बिना रासायनिक औषधी उपचार पद्धतीला जन्म दिला आहे.
       प्रधान मंत्री आदरणीय नरेंद मोदी जी द्वारा वेळोवेळी दिले जाणारे जैविक शेती,सेंद्रिय शेती,नैसर्गिक शेती उत्पादने व millets इत्यादीच्या सेवनासोबत रस आहार,फळ,भाजी पाला ,सलाड आहार,याचा या मध्ये समावेश आहे. या नैसर्गिक पद्धती मुळे,आपणास असलेला मधुमेह,कॅन्सर,मूळव्याध,किडनी फैल हर्निया,थायरॉईड,मुतखडा,कावीळ, स्पोंडील्याईस,डोळ्यांचे आजार,सांधेदुखी, अपेंडिक्स,शित पित,एक्सीमा,गँगरीन,सोरायसिस,अल्सर, जलोदर,स्त्रियांचे आजार, फर्टीलीटी तक्रार सारखे अनेक जुनाट रोग यावर उपचार होतात.
          ठाणे जिल्हा तालुका शहापूर येथील आसनगाव रेल्वे स्टेशन जवळ दरवर्षी प्रमाणे यंदा दि. ९फेब्रुवारी ते १२फेब्रुवारी २०२४ या काळात शहापूर कुणबी महोत्सव आयोजित असून या कुणबी महोत्सवात  आपल्या सेवेसाठी स्टॉल क्रमांक ११५, ११६व ११७ उपलब्ध आहे.येथे कृषी निसर्गोपचार तज्ञ प्रा शिवराम भुवड,प्रा कैलाश देशमुख,डॉ प्रशांत मुळीक ,प्रा बाबासाहेब वामन इत्यादी यांची सेवा सकाळी १०.००ते रात्री ८.००पर्यंत उपलब्ध आहे.,या शिवाय दि. १०फेब्रू व दिनाक ११ फेब्रुवारी २४,रोजी आपणास कृत्रिम बुद्धिमत्तेचे विश्वा मध्ये,कृषी विभाग आत्मा चे महत्व,अनेक आजार बरे 
होण्यासाठी आपले परिसरात असलेली वन औषधी याची ओळख,कृषी विद्यापीठ ,आत्मा चे विकसित तंत्रज्ञान शेतकरी यांचे पर्यंत भारतीय कृषक समाज,लोक विद्यापीठ द्वारा पोहचविण्याचे प्रयत्न होत आहेत.कृषी निसर्गोपचार व आहार पद्धती या विषयावर श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर,गंगा देवस्थान वाफे,शहापूर येथे सकाळी १० ते ०१ आणि ०२ ते ०५ असे विनामूल्य मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे ,अश्या या सुवर्ण संधी  चा लाभ आपण सर्वांनी घेण्या साठी,किल्ले माहुली गड Free Oxygen Park चे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी प्रा मधुकर देशमुख मो 9356764037,आणि सचिव प्रा गोविंद व्यास मो 7709305514 यांचेशी संपर्क करावा असे छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ,अमरावती चे महासंचालक डॉ मंगेश देशमुख यानी प्रसिद्धीस दिले आहे.

    Post Views:  88


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व