श्रीमती हेमा राणूजी घोलप यांना आदर्श शिक्षक पुरस्कार


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  05 Feb 2024, 5:44 PM
   

पुणे : जि प प्राथमिक शाळा माळेगाव ता.खेड येथील आदर्श शिक्षिका श्रीमती हेमा राणूजी घोलप यांना खेड पंचायत समितीचा सन 2021-22 चा गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार  खेड तालुक्याचे कार्यक्षम आमदार मा.दिलीप अण्णा मोहिते पाटील व गटशिक्षणाधिकारी मा.अमोलजी जंगले यांच्या शुभहस्ते व मा.शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी श्री.श्री.चिमटे,जीवनजी कोकणे,नंदा पवार  आदींच्या उपस्थित प्रदान करण्यात आला.सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून गावच्या सरपंच शितलताई जैद, राजेंद्रशेठ कातोरे, स्वातीताई कातोरे, (मा. सरपंच),कैलास कातोरे, नवनाथ कातोरे, शिवाजी शिंदे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सुनिताताई भांगे, केंद्राच्या केंद्रप्रमुख कल्पना टाकळकर आदींनी त्यांचे याबद्दल कौतुक केले आहे.यापूर्वीही त्यांना आदिवासी क्षेत्रातील विशेष योगदान, मोठ्या प्रमाणात लोकसहभाग,इ.साठी पुरस्कार मिळालेले आहे.

    Post Views:  669


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व