सोयाबीन, तूर व हरभरा नोंदणी. खरेदी 10 केंद्रांवर सुरू
अकोला : मार्केटिंग फेडरेशनतर्फे आधारभूत किंमत खरेदी योजनेत सोयाबीन, तूर व हरभरा नोंदणी व खरेदी 10 केंद्रांवर सुरू असून, शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विपणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले.
वा़डेगाव येथे बाळापूर तालुका खरेदी विक्री सह. संस्था, पातूर येथे पातूर तालुका खरेदी विक्री सह. संस्था, बार्शिटाकळी तालुका खरेदी विक्री सह. संस्था, पारस येथे स्व. वसंतराव दांदळे खासगी बाजार समिती, विवरा येथे जय पुंडलीक माऊली ॲग्रो फार्मर कंपनी, तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती, अंदुरा येथे अंदुरा ॲग्रो फार्मर कंपनी, बेलखेड ॲग्रो फार्मर कंपनी, उगवा येथे अनंतकोटी अँग्रो फार्मर कंपनी, थार येथे वक्रतुंड फार्मर कंपनी आदी ठिकाणी नोंदणी खरेदी सुरू आहे.
०००
Post Views: 226