प्राचार्य डॉ जाधव यूनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकेच्या मानद पदवीने सन्मानित


 संजय देशमुख  11 Dec 2021, 1:31 PM
   

परभणी : परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव यांना अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका या विद्यापीठाच्या डिलीट मानद या शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांचे अविरतपणे शिक्षण क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन भारतातील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक कल्याण संघाच्या शिफारशीनुसार ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. 
प्राचार्य डॉ. जाधव मागील बारा वर्षापासून परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाचा शैक्षणिक गुणवत्ता भौतिक विकास झाला. त्यांच्या नेतृत्वात महाविद्यालयाला नॅकच्या पुनर्मूल्यांकन आत ‘अ’ प्लस दर्जा मिळाला. तसेच गौरवपूर्ण असे उत्कृष्टतेची क्षमता असलेले महाविद्यालय (सीपई) भारताच्या विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी आंतरविद्याशाखीय संशोधन योजना परामर्श उन्नत भारत योजना अशा प्रकारची मनुष्यबळ व मानव संसाधन विकास मंत्रालय तथा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने दिली जाणार्‍या योजना व गौरवपूर्ण मानांकनेही मिळाली. या कार्याची दखल घेत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना यापुर्वी उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित केले. काही वर्षांपूर्वी त्यांची समिती बंगलोरने महाविद्यालयात मूल्यांकन समिती परीक्षक म्हणून नेमणूक केली. या माध्यमातून त्यांनी देशभरातील विविध महाविद्यालयांचे बँक मूल्यांकन केले. हा परभणीकरांसाठी बहुमान आहे. प्राचार्य कल्याण संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक प्रश्नांना शासन दरबारी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. प्राचार्य डॉ. जाधव हे उपक्रमशील विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांना मिळालेल्या या सन्मानामुळे महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंत जामकर, सदस्य संजय नखाते, प्रताप देशमुख, प्रा. रामभाऊ घाटगे, केशव दुधाडे, अ‍ॅड. स्वराजसिंह परीहार, परमेश्वर जाधव, डॉ. अफशान खान, प्राचार्य डॉ. व्ही. एम. मोरे, प्राचार्य डॉ. आनंद पार्थीकर, प्राचार्य शाहिद ठेकिया, प्राचार्य शुभांगी काळपांडे तसेच श्री शिवाजी कॅम्पसच्या सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

    Post Views:  358


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व