अकोला - जिल्ह्यात शुक्रवारी (दि.7) रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात 5 हजार 242.97 हेक्टर क्षेत्रावरील गहू, कांदा, टरबुज, पपई, भाजीपाला व निंबु या पिकांचे नुकसान झाले आहे. तर लोणाग्रा ता.अकोला येथे एका युवकाचा वीज पडून मृत्यू झाला असून जिल्ह्यातील 16 जनावरे दगावली आहेत. तसेच 46 घरांचेही नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार बार्शीटाकळी तालुक्यात 199 हेक्टर, पातुर तालुक्यात 3025.97 हेक्टर, अकोला तालुक्यात 725 हेक्टर, मुर्तिजापूर तालुक्यात 52 हेक्टर व बाळापूर तालुक्यात 1241 हेक्टर, असे एकूण 5 हजार 242.97 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात गहू, कांदा, टरबुज, पपई,भाजीपाला व निंबु या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच अकोला तालुक्यात लोणाग्रा येथे पुंडा पंढरी माने(वय 35) या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला. तर अकोला तालुक्यातील 14 लहान जनावरे व बाळापूर तालुक्यातील 2 मोठे जनावरे वीज पडून दगावली. बार्शीटाकळी तालुक्यातील 3 घरे, पातूर येथील 12, अकोला येथील 2, मुर्तिजापूर येथील 26 व बाळापूर येथील दोन घरांचे अंशत तर मुर्तिजापूर तालुक्यातील एका घराचे पुर्णत: नुकसान झाले आहेत, असे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. जिल्ह्यातील इत्तर तालुक्याचे नुकसानीचा अहवाल निरंक असून अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे व सर्व्हेक्षणाची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Post Views: 91
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay