जि. प. सेवानिवृत्त संघटने च्या पाठपुराव्याने सेवानिवृत्तांच्या अनेक समस्या मार्गी


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  11 Mar 2025, 9:14 AM
   

अकोला - अकोला जिल्हा परिषदेत स्थापन करण्यात आलेल्या  जि. प. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे सेवानिवृत्तांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी मोठी मदत झाली आहे. स्थानिक जि. प. कर्मचारी भवनात संघटनेच्या कार्यकारिणीची सभा काल संपन्न झाली. त्यात संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढील एप्रिल महिन्यात संघटनेची आमसभा घेण्याचाही निर्णय घेण्यात आला.
         संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब लांडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेत उपाध्यक्ष प्रदीप खाडे, उपाध्यक्ष प्रेमकुमार खत्री, सचिव वसंतराव कुलकर्णी, कोषाध्यक्ष अशोक मांगुळकर, सहसचिव प्रदीप बेलोकार, संघटक जे. के. खान, तसेच कार्यकारणी सदस्य युसुफ इक्बाल खान सर, भरत आपोतीकर, बाळकृष्ण रोकडे, अरुण साकरकर, नभुताई श्रीवास, रजनी ताई रगडे आदी उपस्थित होते.
               सुमारे नऊ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेत बहुतांश सर्वच संवर्गाचे निवृत्त कर्मचारी सभासद आहेत. या कालावधीत कालबद्ध पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, जुन्या येणे असलेल्या आर्थिक बाबी यासह अनेक. समस्या मार्गी लावण्यात आल्यात. संघटनेच्या या कार्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे. त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा देण्याचाही उपक्रम संघटनेने सुरू केलेला आहे. वर्षभरातून अनेक वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सह इतरही विभाग प्रमुखांशी वेळोवेळी चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी संघटना सतत कार्यरत असते. दर महिन्यात सेवानिवृत्त झालेले अनेक कर्मचारी या संघटनेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन संघटना बळकट करीत आहेत.

    Post Views:  50


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व