अकोला: जिल्ह्यातील माना येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर मध्यरात्री ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात घडला.
चारचाकी मधून प्रवास करणारी मित्रमंडळी त्यांच्या एका मित्राच्या लग्नाला गुजरातला गेले होते. गुजरातहून वरुड कडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार भरधाव असलेल्या चारचाकीने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातात गाडीतील ड्रायव्हर धीरज वैराळे (राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यातील अन्य चार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मूर्तिजापूर येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Post Views: 131
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay