मतदार यादी पुनरीक्षण व मतदान जनजागृती अभियानात एल.आर.टी. कॉलेजच्या एन.सी.सी. कॅडेट्सचा उत्स्फूर्त सहभाग
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
07 Oct 2026, 1:24 PM
श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथे मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण २०२६ व मतदान जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मतदानाचे महत्त्व, मतदारांची जबाबदारी व लोकशाही प्रक्रियेतील सक्रिय सहभाग याबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ३०-अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नोडल अधिकारी गोपाल सुरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच सहाय्यक नोडल अधिकारी अमित डवे व प्रफुल्ल हंबीर यांची उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना मतदार यादी तपासणी, आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करणे तसेच मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी “प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा” या संदेशाद्वारे मतदारांनी मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मतदार यादीत नाव नसल्यास नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी नमुना क्र. ६ द्वारे अर्ज करण्याबाबत माहिती देण्यात आली. या जनजागृती कार्यक्रमात महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागातील कॅडेट्सनी उत्स्फूर्त व भरभरून सहभाग घेतला. मतदानाचे महत्त्व, मतदारांची भूमिका तसेच मतदार यादीतील नाव तपासण्याबाबत कॅडेट्सनी जनजागृती केली. या कार्यक्रमात एन.सी.सी. कॅडेट्स अविनाश वाकोडे, क्रिश करावडिया, आदित्य टाले, निखिल मोटवानी, गफूर परसुवाले, अंश तिवारी, अनुभव सोळंके, अनुभव उप्रास, भूषण सोनारगण, आवेश परसुवाले, डेविड नरेटी, स्मित मिश्रा, मधुरा नरसिंग, अर्पिता जाधव, कोमल इंगळे, श्रुती तिडके, कोमल गावंडे, प्रिती ठोसर, प्रणिका वाकोळे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाने, एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल म. तिरकर, डॉ. निलेश चोटिया, डॉ. मोनिका साबू व प्रा. नीरज ठाकूर उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून कॅडेट्सनी स्वतः मतदानाबाबत जागरूक राहण्यासोबतच आपल्या कुटुंबीय व समाजामध्येही मतदार यादी तपासणी आणि मतदानाबाबत जनजागृती करण्याचा संदेश दिला.
Post Views: 35