भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त नायफड केंद्रात केंद्रस्तरीय बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन
पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने नायफड केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन केंद्रप्रमुख भरतराव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जि प प्राथमिक शाळा नायफड येथे करण्यात आले.
यावेळी इयत्ता पहिली दुसरीच्या छोट्या गटात प्रथम क्रमांक आराध्या भालेराव शाळा-डेहणे, द्वितीय क्रमांक स्वराज सोळशे-वांजाळे, तृतीय क्रमांक गौरी मिलखे - नाव्हाचीवाडी, तर इयत्ता तिसरी चौथीच्या छोट्या गटात अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक समृद्धी कौदरे - डेहणे , गौरी सोळसे - वांजळे, सिद्धेश ठोकळ - खडकवाडी, आणि इयत्ता पाचवी ते आठवीच्या मोठ्या गटात प्रथम क्रमांक सुनिता उंडे - नायफड या विद्यार्थ्यांनी पटकाविले. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना नायफड शाळेचे पदवीधर शिक्षक श्री धनराज अचवलकर यांच्यावतीने उपस्थितांच्या शुभहस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास केंद्रप्रमुख भरतराव लोखंडे साहेब, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे आचार्य दोंदे वसतिगृह सरचिटणीस श्री बाळासाहेब दुंडे, मुख्याध्यापक भास्कर बुरसे, श्री दत्तात्रय आढाव, तंत्रस्नेही शिक्षक श्री बापूराव दराडे, श्री अशोक फसले, श्री देवेंद्र कोकाटे, श्रीमती जयश्री सातकर, श्रीमती हिनाकौसर शाह, आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम तिटकारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विशाल शिंदे यांनी केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक खेड पंचायत समितीचे प्रेरणादायी गटशिक्षण अधिकारी आदरणीय संजयजी नाईकडे व डेहणे बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी आदरणीय श्री जीवनजी कोकणे * यांनी केले आहे.
Post Views: 314