कृषी सहायक दाखवा अन पाचशे रुपये मिळवा! ; कृषी सहायक बेपत्ता


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  09 Nov 2022, 5:38 PM
   

स्वप्निल देशमुख (जिल्हा प्रतिनिधि)
वानखेड :- आमच्या गावचे कृषी सहायक बेपत्ता झाले आहेत. त्यांना शोधून देणाऱ्यास पाचशे रुपयांचे बक्षीस दिले जाईल’ असे पोस्टर वानखेड ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीवर चिटकविण्यात आले आहेत. सरपंच, उपसरपंच व गावकऱ्यांनीच ते लावल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

वानखेड : शेती, शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील दुवा म्हणून कृषी सहायक कार्यरत असतात. त्यांच्यामार्फत अनेक योजना शेतकरी, ग्रामस्थांना कळतात; पण तेच बेपत्ता आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शनच मिळत नसल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वानखेड & दुर्गादैत्य या साझाकरिता एक कृषी सहायक असून ते  बेपत्ता आहे. शेतकरी कार्यालयात चकरा मारून थकले; पण कृषी सहायक मिळत नाही. 
शेतकरी पूर्णत: कृषी विभागावर अवलंबून आहे; पण त्यांना योग्यवेळी मार्गदर्शन मिळत नाही. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दुर्लक्ष  अधिकारीच भेटत नसल्याने शासनाच्या कृषी योजनांपासून शेतकरी वंचित बुलढाणा जिल्हातील संग्रामपुर तालुका कृषी कार्यालयांतर्गत  गावांतील शेतकऱ्यांची गैरसोय 
संग्रामपूर :- अधिकारीच भेटत नसल्याने शासनाच्या कृषी योजनांपासून शेतकरी वंचित. संग्रामपुर तालुका कृषी कार्यालयांतर्गत  गावांतील शेतकऱ्यांची गैरसोय 
मोजके लोकच योजनांचा वारंवार लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे
येथील तालुका कृषी अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे हजारो शेतकऱ्यांना रोज तालुक्यातील कृषि कर्मचारी शोधत फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून राबवण्यिात येत असलेल्या विविध योजना माहितच होत नसल्याने शेतकऱ्यांचा खोळंबा होत आहे. तालुक्यात राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खते, बियाणे, कृषी अवजारे आदी कृषी पुरक साधने उपलब्ध होत असतात. तसेच शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी विषयक मार्गदर्शन देण्याची व्यवस्था असते. शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र संग्रामपुर तालुका कृषि कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या  गावातील शेतकरी या योजनापासून वंचित राहत आहेत.
कृषी कार्यालय हे प्रशासकीय इमारतीत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतातील कामे सोडून कृषी विषयक मार्गदर्शन तसेच शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी प्रशासकीय इमारत मधील कार्यालयात जावे लागते़ तिथे गेल्यानंतर अधिकारी, क्षेत्र भेटीवर गेल्याचे गोंडस कारण सांगितले जाते़ त्यामुळे शेतकऱ्यांना शेकडो रुपयांचा भुर्दंड सहन करुन मनस्तापाशिवाय हाती काहीच लागत नाही.
तालुका कृषि कार्यालयातील अधिकाऱ्यांना कार्यक्षेत्रात राहणे बंधनकारक असतानाही अधिकारी मात्र इतरत्र सोयीनुसार राहत असून कृषी विभागाने शेतकऱ्यांची चेष्टा चालविल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. तालुका कृषि कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तालुका कृषि अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात गटबाजी होत असल्याने कृषी विभागाचा सर्व कारभार रामभरोसे असून विविध कामासाठी नेहमीच तालुक्याच्या ठिकाणी जाणारे मोजकेच लोक अधिकाऱ्यांना हाताशी धरून वारंवार योजनांचा लाभ घेतात.मात्र सामान्य शेतकरी कृषी विभागाच्या योजनांपासून वंचितच आहे. शेतकऱ्यांना तालुका कृषि कार्यालयाकडून काहीच फायदा होत नसल्याने अधिकारी कर्मचारी करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यात शेती विषयातील शास्त्रज्ञ मंडळी कधी येतात ते कुठे येणार, काय करणार याची कसलीही कल्पना शेतकऱ्यांना अथवा गावाना नसते. ही बाब गंभीर आहे. कारण अशा प्रकारामुळे शेतकऱ्यांचा गोंधळ उडतो तसेच त्याचा येण्याचा जाण्याचा खर्चही होतो.
तालुका कृषि अधिकारी फक्त कागदपत्री मेळ घालत आहेत.
यासंदर्भात बोलताना वानखेड गावचे सुनिल शिंगणारे म्हणाले की, आमच्या गावासह परिसरात असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी सहायक नाही. त्यामुळे आमची फरपट होत आहे. हा प्रकार संपणार कधी, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे
तालुका कृषी अधिकारी यांच्या भोंगळ मनमानी कारभारामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची पुरती वाट लागली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करावी व गावोगावी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.
आंदोलन करावे लागेल
तालुका कृषि कार्यालयातील कर्मचारी सज्जावर जाऊन काम न करता ते तालुक्याच्या ठिकाणावरुन कामकाज पाहत असल्याने शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. तालुका कृषि कार्यालयाने कामकाजात सुधारणा नाही केल्यास तालुका कृषि कार्यालया विरुद्ध लवकरच आंदोलन छेडले जाईल.

    Post Views:  205


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व