संतोष इंगळे यांना साहित्यिकांच्या वतीने श्रद्धांजली


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Aug 2022, 9:59 AM
   

अकोला : सृष्टी युवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. संतोष किसनराव इंगळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन अकोला जिल्ह्यातील सर्व साहित्यिक संस्थांच्या वतीने करण्यात आले होते. संतोष इंगळे यांचे बुधवार २४ ऑगस्ट रोजी ब्रेनस्ट्रोक मुळे दुःखद निधन झाले होते. श्रद्धांजली सभेमध्ये संतोष इंगळे यांनी पश्चिम विदर्भाच्या साहित्य चळवळीमध्ये दिलेले योगदान, त्यांचे साहित्यिक कार्य आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. श्रद्धांजली सभेमध्ये सर्व साहित्य संस्थांच्या वतीने संतोष इंगळे यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांच्या कुटुंबीयांना ठोस आर्थिक मदत करण्याचे ठरवले. संतोष इंगळे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि कुटुंबीयांना आर्थिक हातभार लागावा यासाठी सर्व साहित्य संस्थांच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. सृष्टी युवा संस्था, अंकुर साहित्य संघ, अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच, सुजन साहित्य संघ अकोला जिल्हा शाखा, वऱ्हाडी कट्टा, तरुणाई फाउंडेशन, शेतकरी जागर मंच, रजधूळ साहित्य संस्था, शिक्षक साहित्य संघ अकोला जिल्हा शाखा, समरसता साहित्य मंच अकोला, थिऑसॉफिकल लॉज, कवी विचार मंच आणि इतर काही संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 
श्रद्धांजली सभेला पुष्पराज गावंडे (सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई); सदाशिव शेळके (सल्लागार वऱ्हाडी साहित्य मंच); किशोर बळी; सारंग करे; एस.के. कदम; पंकज कांबळे (ए पी आय); अलका माईनकर; विद्या राणे; वनिता गावंडे; सुरेश लांडे (केंद्रीय सचिव अंकुर साहित्य संघ) मालती राठोड; देवका देशमुख; ऍड. रजनी बावस्कर; ज्योती धंदर; राजाभाऊ देशमुख; सुनील दिवनाले; धीरज चावरे; प्रशांत भोंडे; अमोल शिरसाट; प्रवीण हटकर; कविता राठोड; राजाभाऊ देशमुख; विद्या बनाफर; गोपाल मुकुंदे; अमोल गोंडचवर; नरेंद्र जकाते; संजय चौधरी ; सुनील लव्हाळे; राजू चिमणकर; अंबादास चांदूरकर; प्रा नाना भडके; अजय इंगळे; वैभव इंगळे; उषा भोपळे; डॉ. प्रज्ञा कदम; उज्ज्वला कांबळे; प्रतिभा शिरभाते; संदीप देशमुख; प्रा संजय कावरे; संदीप देशमुख; निलेश कवडे आणि सूर्यकांत शास्त्री यांच्यासह श्रद्धांजली सभेला अकोला, वाशिम आणि बुलढाणा परिसरातून साहित्यिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

    Post Views:  374


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व