कर्वे संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये पर्यावरण सेवा योजना
पुणे--- पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे महत्त्व बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी *पर्यावरण सेवा योजना* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या *विद्यापीठ हायस्कूल* प्रशालेमध्ये राबविण्यात येत आहे. *लायन्स क्लब ऑफ सहकार नगर, पुणे* यांच्या माध्यमातून औषधी वनस्पती प्रकल्प प्रशालेत राबविण्यात येत आहे. लायन्स क्लबचे रघुनाथ ढोले देवराई फाउंडेशन नायगाव यांच्या सहकार्याने प्रशालेला शंभर औषधी वनस्पती भेट देण्यात आलेल्या आहेत. पुणे शहर व जिल्ह्यातील जवळजवळ दीडशे शाळांना प्रत्येकी 100 वृक्ष भेट देण्यात आले आहेत. प्रशालेतील नववीच्या विद्यार्थ्यांनी एक झाड दत्तक घेऊन त्याची संवर्धनाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. *पर्यावरण समन्वयक स्मिता जाधव , मनोहर निकम व प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे* यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या आवारात औषधी वनस्पतींचे संवर्धन केले जात आहे. लायन्स क्लब ऑफ सहकारनगर पुणेच्या *अध्यक्षा श्रद्धा शाह, खजिनदार श्रद्धा हाटे, माजी अध्यक्षा ललिता शिंदे* यांनी प्रकल्पाला भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अध्यक्षा श्रद्धा शाह यांनी भविष्यातही असेच सहकार्य प्रशालेला केले जाईल असे सांगितले. देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले व लायन्स क्लब अध्यक्षा श्रद्धा शाह यांचे या प्रकल्पास विशेष सहकार्य लाभले.
Post Views: 358