पल्स पोलिओ लसीकरण अभियानाला ल. रा. तो. च्या एन. सी. सी. कॅडेट्सची मदत
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
05 Mar 2024, 1:39 PM
दि. बेरार जनरल एज्यूकेशन सोसायटी द्वारे संचालित, श्रीमती ल. रा. तो. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील एन. सी. सी. कॅडेट्सनी दि. 03 मार्च रोजी आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या पल्स पोलिओ लसीकरणला जवळपास ०५ वेगवेगळ्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवून आपले योगदान दिले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा अकोला महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दि. ०३/०३/२०२४ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वा. या वेळेत ५ वर्षाखलील सर्व बालकांना पल्स पोलीओचा डोज पाजून मोहीम राबविण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर डी. सिकची यांच्या मार्गदर्शनाखाली व महाविद्यालयाचे एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या आदेशानुसार एन. सी. सी. कॅडेट्सनी या मोहिमेत सहभाग नोंदविला. या मोहिमेत एन.सी.सी. कॅडेट्सनी लसीकरणाला आलेल्या बाळाची माहिती त्यांनी पुरविलेल्या रजिस्टर मध्ये लिहाण्याचे, त्यानंतर त्या बाळाला २ थेंब औषधी देण्याचे व शेवटी त्या बाळाच्या डाव्या हाताच्या करंगळीला शाई लावण्याचे कार्य केले. न्यु तापडिया नगर, गीता नगर, सुधीर कॉलनी, डाबकी रोड व सिव्हिल लाईन परिसर या ठिकाणी ल. रा. तो. च्या एन.सी. सी. कॅडेट्सनी उपस्थिती दर्शवून या मोहिमेत मोलाचा हातभार लावला. शहरातील नागरिकांनी त्यांच्या ५ वर्षा आतील बालकांना पोलीओ डोज पाजून पोलीओ रोगाला हद्दपार करण्याच्या या मोहीमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन या एन. सी. सी. कॅडेट्सकडून करण्यात आले.
या मोहीमेमध्ये सिनियर अंडर ऑफिसर ऋषिकेश पटेल, कॉर्पोरल श्रीकांत वाडोकार, कॉर्पोरल प्रणव इंगोले, कॅडेट अरविंद यादव, जूनियर अंडर ऑफिसर वैष्णवी ढेमारे, सार्जट तनाया नाफाडे, कारपोरल नैना टोंगळे, कारपोरल साक्षी गुप्ता असे 36 एन. सी. सी. कॅडेट्स या मोहीमेमध्ये सहभागी होते असे महाविद्यालयाचे एन.सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर कळवितात.
Post Views: 221