वाशिम : शहरालगत असलेल्या अकोला नाका परिसरात हॉटेल इव्हेंटोजवळ सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. पुण्यावरून यवतमाळला जाणाऱ्या खाजगी बस आणि समृध्दी महामार्गावर चालणाऱ्या पाण्याच्या टॅंकरची एकमेकांस धडक बसल्याने ही भीषण दुर्घटना घडली.
पाण्याच्या टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता अतिशय भीषण होती, त्यामुळे टँकरमधील चालक आणि क्लीनरचा जागीच ठार झाले. तर खासगी बसमधील एक ठार आणि 7 जण जखमी झाले आहेत. टँकरमधील एकजण जखमी असल्याची माहिती आहे. अपघातातील 7 ते 8 जण जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तर काहींना पुढील उपचाराकरिता वाशिम शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्राथमिक उपचार करून गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात येणार आहे.
Post Views: 192
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay