150 वर्षाची शैक्षणिक परंपरा असलेल्या आगरकर कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
11 Jun 2022, 12:52 PM
अकोला ः स्थानिक जिल्हा परिषद आगरकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 98.58% लागला असून विज्ञान व शाखेचा 100 टक्के तर कला शाखेचा निकालामध्ये 87.50 टक्के यात प्रविण्यप्राप्त 51 विद्यार्थ्यांचा समावेश असून कला शाखेतील श्रृष्टी गजानन भिसे 80.50 टक्के घेऊन प्राविण्य श्रेणीत यश मिळविले आहे. तर वाणिज्य शाखेतून साहिल जयकुमार सिरसाट हा 66 टक्के घेऊन शाखेतून प्रथम आला आहे. विज्ञान शाखेतून वेदांत अविनाश तायडे 93, ओम सावरकर 82 तर आस्था चव्हाण 91 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले. अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये संयमाने तोंडे देऊन विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश मिळविल्याची भावना प्राचार्यांनी व्यक्त केली. यशस्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले व खचून न जाता अधिक जोमाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
Post Views: 456