अनैतिक मानवी वाहतूक पोलिस कक्षाकडून ११२ गुन्हे उघडकीस


डाबकी पोलिस स्टेशनमध्ये नोंद गुन्ह्यातील आरोपी व पिडीत मुलगी ताब्यात
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  20 Dec 2023, 10:54 AM
   

अकोला - अकोला पोलिस विभागाच्या अनैतिक मानवी वाहतुक पोलिस कक्षाकडून आतापर्यंत ११२ गुन्हे उघडकीस आणले असून डाबकी  पोलिस स्टेशनच्या नोंद गुन्ह्यातील आरोपी व पिडीत मुलीला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले आहे. महिला व बाल अत्त्याचार संदर्भातील   भादंवी कलम ३६३ व कलम ३६६ (अ) नुसार नोंदविलेल्या गुन्ह्यांचे तपास सुरू असून यामध्ये ७९ गुन्हे आणि हरवलेल्या घटनेतील ३३ अशा एकून ११२ गुन्ह्यांचा तपास करून ते उघडकीस आणण्यात आले आहेत.
         डाबकी  पोलिस स्टेशनमध्ये अप क्र.२११/२०२२ भादंवी कलम ३६३ चा गुन्हा नोंदविलेला होता. या दाखल गुन्ह्यातील आरोपींचा अमरावती, मुंबई,यवतमाळ,नाशिक,नांदेड,
पुणे,अहमदाबाद येथून आरोपींचा शोध न लागल्याने आरोपींचे गुप्त बातमीदारामार्फत मोबाईल क्रमांक घेऊन नातेवाईकांना विश्वासात घेण्यात आले. आरोपीला पिडीतेला कक्षात बोलवून ताब्यात घेण्यात आले आणि पुढील तपास बाकी पोलिसांकडे सोपवण्यात आला.
       सदर कार्यवाही अकोला जिल्हा पोलिस अधिक्षक संदिप घुगे व अप्पर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय खर्चे, पोहेकॉं सुरज मंगरूळकर, धनराज चव्हाण,मपोकॉ.पूनम बचे, पओकॉ.अविद्र खोडे, यांनी केली असून ईतर गुन्ह्यांचेही तपास सुरू आहेत.

    Post Views:  133


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व