२ ऑगस्ट रोजी गोसावी समाजातील गुणवंतांचा सत्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  17 Jul 2026, 9:58 AM
   

अकोला  : अकोला गोसावी समाज मंडळ, उंबरी यांच्या वतीने दशनाम गोसावी समाजातील गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींच्या सत्कार समारंभाचे आयोजन रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता डी.ए.व्ही. कॉन्व्हेंट स्कूल, आर्य समाज मंदिरसमोरील ओपन थिएटर, अकोला येथे करण्यात आले आहे.
या सत्कारासाठी सन २०२6 मध्ये इयत्ता १० वी, १२ वी, पदविका व पदवी परीक्षेत ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, तसेच स्पर्धा परीक्षा, क्रीडा व इतर क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी आपले नाव, संपूर्ण पत्ता व गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत दि. २५ जुलै २०२६ पर्यंत मंडळाचे अध्यक्ष श्री. दिलीप पुरी, कल्पदीप निवास, गायत्री नगर, मोठी उमरी, अकोला या पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच दशनाम गोसावी समाजातील सर्व बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अकोला गोसावी समाज मंडळाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : दिलीप पुरी : ९९२१५४७५२२, विष्णु गिरी : ८८८८२०२०३७, विलास भारती : ९४२३४२९१७५

    Post Views:  10


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व