संविधान हे कायद्याचे पुस्तक व हितसंबंध जपणारा दस्तावेज आहे -- सलीम इनामदार


 vishwaprabhat  27 Nov 2023, 6:01 PM
   

परभणी (जि प्र)  : राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लिहलेले संविधान हे नुसते  कायद्याचे पुस्तक नसून हितसंबंध जपणारा दस्तावेज असल्याचे प्रतिपादन समाजसेवक सलीम इनामदार यांनी परभणी शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध संघटने च्या वतिने घेण्यात आलेल्या संविधान दिना निमित्त व्यक्त केले.                           या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे भगीरथ बद्दर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मुस्लिम खिदमत गार चे शेख ईसाक समाजहित न्युज चे संपादक प्रमोद अंभोरे, मुस्लिम विकास परीषदेचे शेख सरफराज रुग्ण हक्क संरक्षण समीतीचे दिलीप बनकर देवानंद वाकोडे लोकश्रेय मित्र मंडळा चे जितुंर तालुका अध्यक्ष शेख शब्बीर बाबा यांची उपस्थिती होती तर या वेळी प्रमोद अशोकराव अंभोरे, शेख इसाक शेख सलीम यांची समयोचित भाषणे झाली पुढे बोलताना सलीम इनामदार यांनी स्वातंत्र्य पुर्वी आपण सर्व जण एकत्र नव्हतो तर विखुरलेले होतो संविधानाने मी या शब्दाला आम्ही केले या देशात विविध वतने राजाची स्वातंत्र राज्य वेगवेगळे व आपआपले भुभागाचे लोक एक मेकाना एकाच देशाचे समजत नव्हते या संविधानने  भारत या देशाचे नागरिक म्हटले व लोकशाही गणराज्य घडविण्याचा सामाजिक न्याय आर्थिक न्याय राज नैतिक न्याय विचार स्वातंत्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य विश्वास स्वातंत्र्य श्रद्धा व उपासना  चे स्वातंत्र्य दर्जाची समानता संधिची समानता व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्रा ची एकता व एकात्मता बंधुत्व प्रवृधित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार अंगीकृत अथिनियमित संविधान असल्याचे सांगीतले तर हे एक दस्तावेज असुन जशी माणसे शेती जमीन सात बारा जागेचे खरेदी खत असते त्याही पेक्षा मोठे दस्तावेज संविधान असुन कायदा पोलीस प्रशासन न्यालय व राजकीय पुनर्वसन या संविधान  नुसारच चालत असल्याचे ही सलीम इनामदार यांनी सांगीतले बद्दर यांनी अध्यक्ष स्थाना वरुन  संविधान मुळे च आपली ओळख व किंमत असल्याचे सांगीतले या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद अंभोरे व शेख इसाक यांनी केले होते तर  या वेळी समाजहित अभियान प्रतिष्ठान, दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी, मुस्लिम संघर्ष न्युज मुस्लिम विकास परिषद लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्र रुग्ण हक्क संघर्ष समिती इत्यादीं संस्था व संघटने च्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती तर सूत्रसंचलन  शेख अझर यांनी केले तर अभार प्रदर्शन  दिलीप बनकर यांनी व्यक्त केले.

    Post Views:  182


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व