अकोला : चरणगाव येथील मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या सभे करता आलेल्या लोकांसाठी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करून खिचडी वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन पंजाबी शीख कुटुंबातील एका सोळा वर्षाच्या युवक समाजसेवक केल्विन सुबी व त्याची आई समाजसेविका कमलजीत कौर यांच्या मदतीने सहकार्याने संकल्पनेतून निर्भय बनो जन आंदोलन, अ. भा. मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चरणगाव येथील सभा स्थळाच्या परिसरात सकाळी दहा वाजता पासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा अन्नदानाचा कार्यक्रम अखंडपणे चालू होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता समाजसेविका कमलजीत कौर, युवा समाजसेवक केल्विन सुबी, समाजसेवक गजानन हरणे, दादाराव पाथीकर, नंदकिशोर गावंडे, प्रमोद धर्माळे, नरेश सूर्यवंशी, शेख अन्सार अली, शुभम रक्षक, संतोष टिकार, पुरुषोत्तम राऊत, कैलास पागृता, विशाल टिकार यांच्यासह अनेक समाजसेवकांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पडला या महाप्रसादाचा लाभ जाहीर सभेसाठी आलेल्या हजारो लोकांनी घेतला. या अन्नदान कार्यक्रम आयोजनाबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजकांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त करण्यात आले.