सिंधुबाई विठ्ठलराव आदोडे यांचे निधन
परळी-- परळी (वै.) जि.बीड - येथील भीम नगर मध्ये वास्तव्यास असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील ज्येष्ठ नेते स्मृती .यांच्या धम्मपत्नी सिंधुबाई विठ्ठलराव आदोडे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मराठवाडा विभागिय संघटन तथा संपर्क प्रमुख श्री.देवानंदजी वाकळे यांच्या सासूबाई यांना वर्धापकाळाने परभणी येथील त्यांची मुलगी वर्षा देवानंद वाकळे यांचे निवासस्थानी दि.२८ जुलै २०२४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
कालकथीत सिंधुबाई आपले पतीसोबत सामाजिक कार्यासाठी त्यांना नेहमी साथ देत असत. समाज बांधवांबरोबरच, रुग्णांची सेवा, वृद्ध महिला ,गरजूवंत ,दुर्बल यांचे आधारस्तंभ ,अनाथांचे पालकत्व स्वीकारून सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य त्यांनी पार पाडलेले आहे . त्याकाळी बहुजन समाजाचे, आदोडे कुटुंबीय आधारवड होते. सिंधुताईंनी वृद्धावस्थेतील शेवटचा काळ आपल्या वर्षा या मुलीकडेच घालविला. विशेष म्हणजे त्यांचा नातू वैभव देवानंद वाकळे यांनी, आपल्या आजीची वृद्धावस्थेची सुश्रुशा अहोरात्र केली. शेवटी सिंधुबाईंनी आपला अखेरचा श्वास जावई देवानंद वाकळे यांचे घरीच सोडला. निधन समयी त्या 68 वर्षाच्या होत्या .त्यांच्या पश्चात अविनाश ,मनीष ,ज्योती ,वर्षा ,शीतल,अशी दोन मुले ,तीन मुली ,सुना ,नातवंडे ,पुत्रवंडे असा मोठा परिवार आहे. परभणी येथील पत्रकार देवानंद शंकराव वाकळे यांच्या त्या सासू होत.
Connection failed: Operation not permitted