महाराजा कॉलेज खेळाडू रिद्धी सप्रे हीची क्रॉस कंट्री राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड


 विश्व प्रभात  17 Dec 2024, 6:19 PM
   

वैभव हराळ,जिल्हा प्रतिनिधी 
श्रीगोंदा - अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा नुकत्याच वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुल अहमदनगर  या ठिकाणी   पार पडल्या त्या स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील अथलेटिक्स खेळाडू रिद्धी सप्रे हिने 18 वर्ष वयोगटात क्रमांक मिळवला तिची 
 अमरावती येथे दिनांक 03 जानेवारी रोजी SRFP मैदानावरती होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी निवड झाली. झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये रिद्धी सप्रेला गुणवत्ता प्रमाणपत्र व मेडल देण्यात दिले.
        विजयी खेळाडूचे महाविद्यालयीन विकास समिती चेअरमन माजी आ. बबनराव पाचपुते, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आ. राहुल जगताप, महावीर पाठवा, कॉलेजचे प्राचार्य महादेव जरे साहेब, जूनि. उपप्राचार्य शहाजी मखरे, पर्यवेक्षक झिटे सर, डॉ. प्रकाश साळवे, प्रा. सुदाम भुजबळ, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रिद्धी ला तिचे कोच जावेद सर, क्रीडा शिक्षक संजय डफळ, संतोष जाधव, शारीरिक शिक्षण संचालिका कल्पना बागुल यांचे मार्गदर्शन मिळाले.

    Post Views:  165


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व