सरेवाडी जिल्हा परिषद शाळेत आरोग्य तपासणी


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2023-02-13
   

पुणे--जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरेवाडी येथे सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विभागाने महाराष्ट्र राज्यात सुरू केलेला कार्यक्रम जागृत पालक, सुदृढ बालक या अभियानांतर्गत शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली. अभियानास शालेय विद्यार्थी उपस्थित होते त्यांची तपासणी करण्यात आली.शालेय विद्यार्थ्यांना डेहणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सौ.ज्योती जगताप सी.एच.ओ यांनी विद्यार्थ्यांना खाण्यापिण्याच्या विविध बाबींविषयी व दैनंदिन आहार संतुलित कसा असावा,याचा संबंध आरोग्याशी आहे याबाबत मार्गदर्शन केले.आरोग्य तपासणी बरोबर विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दत्तात्रय ठोकळ,श्री.अभिजीत काळे ,श्री कैलास हुरेज आरोग्य सेवक, सौ.ज्योती तिटकारे आशा वर्कर , सौ.सुलाबाई ठोकळ अंगणवाडीताई, सौ.हिराबाई ठोकळ शालेय पोषण आहार स्वयंपाकी उपस्थित होते. खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. जीवनजी कोकणे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भरतराव लोखंडे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री.बापुराव दराडे यांनी त्यांचे स्वागत शाल श्रीफळ व पुष्प देऊन केले.कार्यक्रमाची व्यवस्था श्री.विजयकुमार शेटे यांनी पाहिली.

    Post Views:  675


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व