खेंडकर विद्यालयमधे सविधान वाचन व २६/११ मधिल शहीदांना श्रध्दांजली
अकोला, दि. २६ नोव्हेंबर : भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने स्वीकारले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली, या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून २६ नोव्हेंबरला हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतीय राज्यघटनेच्या संविधान बहात्तरव्या वर्धापनदिनानिमित्त विष्णुपंत खेंडकर विद्यालय, स्व. यमुनाबाई खेंडकर प्राथमीक शाळा व स्व. नारायणराव खेंडकर काॅन्व्हेंट बायपास रोड अकोला येथे शुक्रवारी संविधान दिन साजरा करण्यात आला तसेच २६/११ मधील शहीद झालेल्या शहीदांना श्रध्दांजली देण्यात आली. कोरोना आजाराचे सावट झाल्यानंतर शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला, आणि आज प्रथमच लाडक्या विद्यार्थींच्या समवेत हा कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करून पार पाडण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थांनी सविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करून संविधानाची सर्वांना ओळख करून दिली. तसेच २६/११ मधिल मुंबई ताज हॉटेल मधे झालेल्या आतंकवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव व माध्यमीक विद्यालयाचे मुख्याध्यापक व अकोला महानगर मुख्याध्यापक संघाचे सचिव व अकोला जिला स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृतीसंघटना अमरावती विभागाचे सहसचिव निलेश खेंडकर सर उपस्थित होते, संस्थेचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब खेंडकर सर यांची प्राथनीय उपस्थिती होती. तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष व प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक तसेच महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष व मराठा महासंघाचे अकोला महानगर उपाध्यक्ष तसेच छत्रपती शिव प्रतिष्ठानचे शहर सदस्य अल्केश खेंडकर सर लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. निलेश खेंडकर सर यांनी शाळा सुरू होण्या विषयी माहीती दिली, व शासनाने शाळा सुरू करण्या संदर्भात हिरवी झेंडी दिली आहे, १डिसेंबर पासून इयत्तेत पहीली पासुन शाळा सुरू करण्यात येईल, असे आपल्या भाषणातुन मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आशा काळे मॅडम यांनी केले. तर आभार उषा ऊबाळे मॅडम यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्या साठी शाळेतील शिक्षक सुरेश सुरत्ने, माया खोडके मॅडम, कांचन शिरसाट मॅडम, प्रज्ञानंद थोरात, श्रीकांत पागृत, गोपाल वानखडे व प्रशांत काळे यांनी परीश्रम घेतले.
Post Views: 336