गणितात 7 विश्वविक्रम करणारा प्रणित कुमार स्वरसंध्या कार्यक्रमात करणार प्रदर्शन


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  01 Jun 2022, 7:41 PM
   

अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे १२ जून २०२२ रोजी, रविवारी सायं ६ वा.खुले नाट्यगृह येथे स्वरसंध्या हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे.सदर कार्यक्रमात गणितात 7 विश्वविक्रम करणारा व बालश्री पुरस्कार प्राप्त प्रणित कुमार गुप्ता गणिताचे प्रात्यक्षिक अवघ्या तीन सेकंदात सोडवून दाखवणार आहे.या कार्यक्रमात नागपूर येथील अंध कलावंत धनुष कुमार,अकोल्यातील ७ वर्षांची बाल कलावंत मंजीरी पांडे व नितीन खंडारे यांचे संगीत प्रदर्शन रसिकांना अनुभवता येणार आहे.या कार्यक्रमात व्हिल चेअर ,कर्ण यंत्र, व्हाईट केन व शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.दिव्यांगांची नोंदणी व प्रवेशिका मिळवण्यासाठी संस्थेच्या हेल्पलाईन 9423650090क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान प्रा.विशाल कोरडे, अनामिका देशपांडे, आनंद अग्रवाल, सिद्धार्थ रुहाटिया,राम  पाटील, डॉ.सतिश उटांगळे, रितेश मिरझापूरे,भाग्यश्री देशमुख, मिनाक्षी फिरके,सचिन बुरघाटे, हर्षवर्धन मानकर,पवनकुमार कछोट व कल्पना देशमुख यांनी केले आहे.

    Post Views:  360


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व