आधुनिक गझलचा सूर हरवला


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Feb 2024, 11:25 AM
   

अकोला : आज दिनांक 26 फेब्रुवारी  २०२४ रोजी भारतीय गझलचा चेहरा असणारे सुप्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे वयाच्या 72 व्या वर्षी आजारपणात मुळे दुःखद निधन झाले. शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी असणाऱ्या पंकज उधास यांनी 1980 मध्ये पहिला गझल अल्बम आहट ध्वनिमुद्रित केला . त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. गझल क्षेत्रात  जगजीत सिंग नंतर भारतीय गझल लोकप्रियतेकडे नेण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता . चिट्ठी आई है या नाम चित्रपटातून त्यांनी आपल्या गझल गायकीला नवीन आयाम दिला. युवकांमध्ये गझल चे प्रेम व लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांनी नज्म या प्रकाराचा साध्या व सरळ संगीतातून प्रयोग केला. ना कजरे की धार अशा चित्रपट गीतातून गझल प्रकाराला नवीन दिशा देत तबला व शास्त्रीय संगीताला ही आपले महान योगदान देणाऱ्या पंकज उधास च्या जग सोडून जाण्याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे . आधुनिक गझलचा सूर हरवला . असे  मत अकोल्यातील संगीत क्षेत्रातील कलावंत , श्री शिवाजी महाविद्यालय अकोल्याचे सहाय्यक प्राध्यापक व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांनी व्यक्त केले आहे.

    Post Views:  184


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व