अकोला पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून पिडीत महिलेचा शोध.. १०८ गुन्हे उघडकीस


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  21 Nov 2023, 7:37 PM
   

अकोला- अकोला पोलिस विभागाच्या मानवी वाहतूक कक्षाकडून महिला व बाल अत्त्याचार संदर्भात कलम ३६३ आणि ३६६(अ ) तसेच महिला हरविल्याच्या प्रकरणात आतापर्यंत एकून १०८ गुन्ह्यांचा तपास लागला आहे.यामध्ये ७५ गुन्हे व ३३ हरवल्याच्या प्रकरणांचा समावेश असून,मुर्तिजापूर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या तक्रारीतील पिडीत मुलगी आणि आरोपीचा शोध घेण्यात पोलिस नुकतेच यशस्वी झाले आहेत.
           पोलिस स्टेशन मुर्तिजापूर शहर येथे अप क्र.११३/२०२३ का ३६३ भादंवी नुसार गुन्ह्याची नोंद झालेली होती.या प्रकरणातील आरोपी आणि पिडीत मुलगी ग्राम पातुर्डा, ता.संग्रामपूर ,जि.बुलढाणा येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तेथे जाऊन त्यांना ताब्यात घेतले.आरोपीचे वर्णन सांगून याबाबत तासगाव पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले.हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी मुर्तिजापूर पोलिसांकडे देण्यात आले आहे.
                  सदर कार्यवाही अकोला पोलिस अधिक्षक संदीप घुगे व अप्पर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय खर्चे,पोहेकॉ.सुरज मंगरूळकर,धनराज चव्हाण,नागोराव भांगे,मपोकॉ.पूनम बचे,पोकॉ.अविन्द्र खोडे,वाहन चालक जीपीएसआय अन्वर खान यांनी केली.ईतर गुन्ह्यातील आरोपी आणि पिडीत मुलींचाही कसून शोध घेऊन  गुन्ह्यांचा तत्परतेने निपटारा करण्यास अनैतिक मानवी वाहतूक कक्ष सक्रिय आहे.

    Post Views:  285


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व