फी दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांना लायब्ररीत कोडले


बोईसरच्या चिन्मया शाळेतील संतापजनक प्रकार
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  05 Apr 2022, 2:01 PM
   

बोईसर ( संतोष घरत )   कोरोना काळातील लॉकडाऊन दरम्यान थकित असलेल्या फीस न भरलेल्या मुलांना शाळेच्या पाहिल्या दिवशी वर्गात न बसू देता  Sr. Kg तील 5 वर्षाच्या मुला पासून ते पुढे सर्व मुलांना शाळेच्या लायब्ररीत शाळा सुटे पर्यंत  कोंडून ठेवण्याचा संतापजनक प्रकार बोईसरमधील चिन्मया शाळेत घडविण्यात आला आहे. शाळा सुटल्या नंतर लहान मुलांचे रडावलेले चेहरे पाहून पालकांचा संताप अनावर झाला ,
  मुलांना वर्गात बसू द्यायचे नव्हते तर गेट च्या आत का घेतले,  पुढल्या इयत्तेतील पुस्तक विकत का दिली,तसेच त्याचवेळी फी भरल्या शिवाय पुढल्या वर्गात प्रवेश दिला जाणार नाही हे का नाही सूचित केले असे प्रश्‍न पालकांनी मुख्याध्यापक व व्यवस्थापनाकडे उपस्थित केले आहेत.
 त्या ३तासात वाळीत टाकलेल्या बाल मनावर काय परिणाम झाले असतील हे समजून घेण्याची मानसिकता नसलेले पैशासाठी प्रवेशाच्या वेळेस २० ते ४० हजार डोनेशन घेऊन पैशासाठी हपापलेल्या  व्यवस्थापनाच्या सुचनांवरून  फक्त २००० नाही भरले म्हणून फी साठी चेक नाही चालणार ,नगदी भरावे लागतील , पूर्ण थकबाकी भरल्या शिवाय पैसेच घेणार नाहीत, अशा प्रकारे पालकांसोबत सोबत हुज्जती घातल्या गेल्या आणि पालक हतबल होऊन सहन करीत होते.अशा तक्रारी संतप्त पालकांनी केल्या आहेत. 
प्रिन्सिपल सोबत १० वेळा मोबाईल वर संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही कॉल उचलले नाहीत आणि ऑफिस मध्ये स्टाफ शिवाय कुणीही जबाबदार अधिकारी उपस्थित राहिला नाही . 
गेल्या २ वर्षापासून  पालक वर्ग नवीन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याची मागणी करीत आहेत . त्या संदर्भात पालघर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात २ वेळा बैठकीत स्पष्ट निर्देश देऊनही आधी  कोरोना व आता टाळा टाळ करून पालकांना त्यांच्या न्याय हक्कापासून दूर ठेऊन गळचेपी केली जात आहे . 
वर्ष भर पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागात वारंवार तक्रारी करून व बैठका घेऊनही देखील पालकांचे प्रश्न अनुत्तरित आहेत.. या वेळेस तरी जिल्हा शिक्षण प्रशासन लक्ष देईल का ? की नेहमीप्रमाणे तक्रार आली म्हणून शाळेची व्हिजिट करण्याच्या बहाण्याने पाकीट घेऊन माघारी परततील हे पहावे आता लागेल.

    Post Views:  652


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व