खा.अनुप धोत्रे यांचा अकोला वकील संघातर्फे सत्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  20 Jun 2024, 6:37 PM
   

अकोला : अकोल्याचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांचा आज अकोला वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अकोला बार  असो ने खा. अनुप धोत्रे यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या आयोजन केले होते. 
या कार्यक्रमाला महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे माजी सदस्य बी के गांधी, तसेच विद्यमान सदस्य एमजी मोहता, ॲड सुभासिंह ठाकूर यांच्यासह ज्येष्ठ विधीज्ञांची उपस्थिती होती. वकील संघाचे अध्यक्ष  अँड हेमंत मोहता, उपाध्यक्ष अँड.नरेंद्र बेलसरे, सचिव अँड विनय यावलकर, सहसचिव अँड शिवम शर्मा , सहसचिव अँड दुष्यंत धोत्रे, यांनी खासदार अनुप धोत्रे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. 
यावेळी अनुप धोत्रे म्हणाले की, वकील मंडळीच्या समस्या सोडविण्याचा मी प्रयत्न करेल. सत्कार कार्यक्रमानंतर खासदार धोत्रे यांनी अकोला वकील संघ. जिल्हा सरकारी वकील कार्यालयाला भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत मोहता,संचालन अँड देवाशिष काकड यांनी केले तर आभार प्रदर्शन अँड नरेंद्र बेलसरे यांनी केले.

    Post Views:  44


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व