अकोला,दि.17(जिमाका)- शहरातील कौलखेड परिसरात बिबट सदृश्य प्राणी आढळल्याचे व त्याचे पायाचे ठसे आढळून आल्याचे स्थानिक रहिवासी यांनी कळविले होते. तसेच समाज माध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले असून हा व्हिडीओ जूना व अन्य्ा ठिकाणचा आहे, असे उपवनसंरक्षक अकोला वन विभाग अर्जुना के .आर. यानी कळविले आहे. तसेच नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन केले आहे.
शहरातील कौलखेड भागातील एस.टी.वर्कशॉप परिसरात बिबट सदृश्य प्राणी दिसून आल्याचे स्थानिकांनी कळविले होते. त्याअनुषंगाने वनविभाग व पोलिस कर्मचारी यांनी संयुक्तरित्या परिसरात पायी गस्त व झाडी क्षेत्रात ड्रोन कॅमेऱ्याच्या सहायाने तपासणी करण्यात आली असता वाघ किंवा बिबट सदृश्य प्राणी दिसून आलेला नाही. तसेच मागील दोन-तिन दिवसापासून समाज माध्यमामध्ये व्हॉट्सॲप व फेसबुकवर शहरात वाघ दिसून आल्यचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओची पडताळणी केली असता व्हिडीओ जुना व दुसऱ्याचा ठिकाणचा असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तरी नागरिकांना सतर्क राहून काही अनुचित प्रकार आढळून आल्यास घाबरुन न जाता वनविभागास कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 462
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay