भाजपा बेस्ट कामगार संघटनेचा कामगार आंदोलनाला पाठींबा


 विश्वप्रभात  12 Nov 2025, 6:56 PM
   

अकोला - आज गरज आहे लढाव्य नेतृत्वाची म्हणून पक्ष भेद, संघटना वाद बाजूला ठेवून* भाजपा बेस्ट कामगार संघातर्फे  बेस्ट वर्कर्स युनियन चे  सरचिटणीस श्री शशांक शरद राव हे बेस्ट कामगारांच्या मागण्या व दिर्घ काळीन प्रश्न सोडवण्यासाठी,मंजूर करण्यासाठी व सेवानिवृत्त कामगारांचे आर्थिक देणे लवकरात लवकर सरकारने अदा करण्यासाठी व बेस्ट उपक्रमात सध्या चालू असलेली अतीबिकट परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी, बेस्टच्या बसेस चा ताफा पूर्ववत करण्यासाठी, उपोषणाला बसलेले आहेत मुंबईची लाल परी व त्या लाल परी साठी काम करणारे कंडक्टर आणि ड्रायव्हर आणि सर्व कर्मचारी आज फार मोठ्या संकटात सापडलेले असून त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने व मुंबई महानगरपालिकेने त्यांना मदत करून बेस्ट कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे बेस्ट बसेस बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या घेण्यात याव्या, अशा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या व त्यासाठी लागणारा आर्थिक निधी   शासनाने लवकरात लवकर देऊन बेस्ट कामगारांना न्याय द्यावा, त्यासाठी 10 नोव्हेंबर पासून श्री शशांक राव  उपोषणाला बसलेले आहेत, म्हणून भाजपा बेस्ट कामगार संघ कडून आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत, संघटनेचे अध्यक्ष श्री गणेश हाके साहेब कार्यकारी अध्यक्ष व बेस्ट समिती सदस्य श्री सुनील गणाचार्य साहेब सरचिटणीस श्री गजानन नागे व उपाध्यक्ष आनंद जरग, सहसचिव श्री महादेव खाडे, आगार अध्यक्ष दिलीप दौड इतर सर्व भाजपा बेस्ट कामगार संघाचे पदाधिकारी यांनी आज श्री शशांक राव यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबाचे पत्र देऊन सर्वतोपरीने आंदोलनात सहभागी होण्याचे  जाहीर आश्वासन देऊन भेट घेतले आहे. तरी तमाम सर्व भाजपा बेस्ट कामगार संघाच्या सदस्यांनी या सर्व गोष्टीचा विचार करून सर्व आगारांमध्ये श्री शशांक राव यांच्या  आंदोलनाच्या पाठीशी राहून, त्यांना बळ देऊया आणि आपल्या बेस्ट कामगारांचा प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी एकसंघ राहू या.. ...जय हिंद.. जय महाराष्ट्र.. जय कामगार

    Post Views:  58


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व