सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या भू-माफियांविरूध्द प्रशासनाची कारवाई का नाही ?


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  07 Oct 2023, 1:14 PM
   

बोईसर - (संतोष घरत) - पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सरकारी व वन विभागाच्या जमिनीवर भूमाफियांनी अनधिकृत जमिनी बळकावून त्या ठिकाणी मोठमोठी बांधकामे सुरू केलेली आहे . परंतु संबंधित खात्याचे अधिकारी अशा या सुरू असलेल्या बांधकामावर डोळे झाक करत असल्याने त्यांच्या विरुद्ध जनतेमध्ये पाल चूक - चुकत असताना दिसत आहे.
     बोईसर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये गणेश नगर व इतर ठिकाणी वन विभागाच्या जमीन व इतर सरकारी जमिनीवर भूमाफियाने मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू करून त्या ठिकाणी मोठमोठ्या चाळी उभारल्या ह्या बाबतीत सोशल मीडिया व वृत्तपत्रांमध्ये  बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच तक्रारदाराने लेखी तक्रार देऊन सुद्धा त्या बांधकामाकडे तलाठी व संबंधित अधिकारीने जाणून-बुजून दुर्लक्ष केल्यामुळे आज त्या भागामध्ये मोठ - मोठी अतिक्रम व बांधकामे झालेली दिसून येतात . ही बांधकामे व अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाल्याने जनतेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांविषयी संशय व्यक्त केला जात आहे .
    पालघर बोईसर ह्या मुख्य रस्त्यावर सरावली ह्या ठिकाणी गेल्या कित्येक महिन्यापासून छोटी-मोठी अनधिकृत बांधकामे  सुरू आहेत. हा रस्त्याने  संबंधित विभागाचे अनेक अधिकारी ये-जा करीत असतात. मग त्यांना ही अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का?  की ह्या भूमाफिया बरोबर काही धागे दोरे तर नाहीत ना ? असा प्रश्न जनतेला भेडसावत आहे.
       बोईसर पालघर रस्त्यावरील सरावली पुलाच्या आजूबाजूला अनेक अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. याबाबत अनेक तक्रारी करून सुद्धा महसूल विभाग दुर्लक्ष करत आहेत  त्यामुळे आता त्या ठिकाणी जोरदार दिवस रात्र काम सुरू असून मोठमोठे त्या ठिकाणी दुकाने उभारण्यात आली आहेत  . नक्की ह्या बांधकामावर आशीर्वाद कुणाचा? सदर सुरू असलेली अनधिकृत बांधकामे तोडली न गेल्यास भविष्यात पावसाचे  पाणी जाण्यास अडथळा होऊन तिकडे महापूर स्थिती निर्माण होईल ह्या मध्ये कोणतीच शंका नाही. सदर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम, व अतिक्रमण केलेल्या जमिनी तसेच ते खोदकाम करण्यासाठी संबंधित विभागाचे परवाने घेतले नसून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला आहे. ह्याची चौकशी करून  त्याच्यावर योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करून त्या बांधकामावर तोडक कारवाई करण्यात यावी अशी जनतेकडून मागणी होत आहे.
अशा ह्या अनधिकृत बांधकामामुळे सरावली गाव पाण्याखाली येईल व अनेक घटना त्या ठिकाणी घडू शकतील .याची दखल घेऊन लवकरात लवकर त्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण सरावली गाव येणाऱ्या काही दिवसात तहसील   कार्यालयासमोर जन - आंदोलन करेल. आता ह्या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी व तहसीलदार कोणती भूमिका बजावतात हे महत्त्वाचे ठरेल.

    Post Views:  359


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व