जिल्हा न्यायालयात लागली छत्रपती शिवरायांची भव्य प्रतिमा


बार असो. च्या पदाधिकाऱ्यांचा मराठा समाजातर्फे गौरव
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  04 Mar 2025, 12:12 PM
   

 अकोला - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मुहूर्तावर स्थानिक जिल्हा व सत्र न्यायालयात धातूत कोरीव काम केलेली भव्य अशी शिवप्रतिमा लावण्यात आली आहे. या भव्यप्रतिमेच्या अनावरण कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. श्री. अनिल किलोर, न्यायमूर्ती  मा. श्री. संजय  मेहरे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  मा. श्री. राजेश तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.
                      छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा लावण्यासाठी महाराष्ट्र, गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. मोतीसिंग  मोहता यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. हेमसिंग मोहता, उपाध्यक्ष अँड. सुनिता कपिले, उपाध्यक्ष ऍड, संतोष वाघमारे, सचिव ऍड. शिवम शर्मा, सहसचिव ऍड. दुष्यंत धोत्रे, सहसचिव ऍड. प्रदीप खेरडे, ग्रंथपाल ॲड. अनिल पारवाणी, ऑडिटर ऍड. विनय यावलकर यांनी व त्यांच्या सदस्यांनी पुढाकार घेतलेला आहे. ऍड. मोतीसिंग मोहता यांनी कायद्याची परिपुर्तता करून ही प्रतिमा लावल्याबद्दल त्यांच्यासह बार. असो. च्या उपरोक्त सर्व पदाधिकाऱ्यांचा आज मराठा समाजातर्फे गौरव करण्यात आला. न्यायालयात ही प्रतिमा लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आल्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
                आजच्या या गौरव कार्यक्रमात ऍड. मोतीसिंगं मोहता, ऍड. बी. के. गांधी. माजी आमदार नारायणराव गव्हाणकर. मराठा समाजाचे नेते विनायकराव पवार, डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रदीप खाडे, राम मुळे. महादेवराव भुईभार अशोक पटोकार, राम गव्हाणकर, छावाचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे, ऍड. विनय यावलकर, प्रदीप चोरे, पंकज साबळे, पंकज जायले, संजय सूर्यवंशी, बबनराव कानकिरड, अण्णासाहेब टाले, गंगाधर पाटील, अनिरुद्ध देशमुख, बाळू ढोले पाटील, प्रवीण महल्ले, राजेश पाटील, नरेंद्र देशमुख, संजय देशमुख, सतीश सुर्वे, इंदुमती देशमुख, सविता कुटे, ऍड. रूपाली शेजोळे, रेणूताई गावंडे, मृदुला गावंडे,डॉ. विजय जाधव, ऍड.कपिला, ऍड. नागेश म्हसाळ, ऍड. टावरी, ऍड. संतोष भोंडे, मुकेश माळी, अरुण खोटरे, श्रीकांत सरोदे, प्रदीप लुगडे, यांचे सह इतरही पदाधिकारी उपस्थित होते 

    Post Views:  34


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व