नजरे समोर अनधिकृत कामे सुरू, परंतु महसूल विभाग मुग गिळून गप्प
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
09 Jun 2023, 3:31 PM
बोईसर -(संतोष घरत ) -पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट चालू आहे, परंतु महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे जनतेकडून बोलले जात आहे .
पालघर मधील सरावली - पंचाली च्या हद्दीमध्ये सरावली पुलाच्या (ब्रिजच्या )दोन्ही बाजूस खजान जागेवर भूमाफियांनी जमिनी विकत घेऊन त्या ठिकाणी सपाटीकरण (लेवल )करून मोठया प्रमाणत दुकानी गाळे बांधले आहेत . आणि आजही जेसीबीची साह्याने मुरूम खोदाई व भरणी चे काम झपाट्याने सुरू आहे .काही काळानंतर त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे होतील ह्या मध्ये तीळ मात्र शंका नाही. सरावली ब्रिजच्या दोन्ही बाजूला जे काम चालू आहे ती जागा सरकारी (खजान ) स्वरूची असून शासनाची कुठल्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता त्या जमिनीवर सपाटीकरण चालूअसून मोठ्या प्रमाणात भराव करून शासनाचा महसूल बुडविला आहे जात आहे.. काम सुरु असलेल्या जागेजवळून पालघर जिल्हा असल्याने दररोज येणारे - जाणारे अधिकारी ह्याचं रस्त्याने प्रवास करत असतात. ही अनधिकृत कामे रोज नजरेसमोरून जातात ,तरी त्या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक लक्ष न दिल्याने त्या ठिकाणी पुढे अनधिकृत बांधकामे होऊन, समुद्राचे पाणी जाण्यास जागा न मिळाल्याने ते सर्व पाणी तेथील पारिसरातील गावामध्ये शिरण्याची शक्यता आहे . पाणी गावामध्ये शिकल्याने पुरस्थिती निर्माण होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होइल. वेळेसच सदर सपाटीकरण करण्याचे काम बंद करून त्या भू माफिया वर कडक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी जनतेच मध्ये कुजबुज सुरू आहे.
ह्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर जिल्हाधिकारी गोविंद बोडके कोणती कारवाई करतात . हया कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 265