निसर्गाचे रक्षण हेच आपले संरक्षण


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  25 May 2022, 8:41 AM
   

वास्तविक रक्षण व संरक्षण यात फारसा फरक नाही.परंतु एका दृष्टीने विचार केला तर वृक्षांचे  रक्षण हेच आपलेही संरक्षण होवू शकते.. याचा सारासार विचार करता ; माहे एप्रिल व मे मध्ये  ऊष्णतेने, उकाड्याने व मोठ्या प्रमाणात वाढलेल्या तापमानवाढीने अनेक समस्यांमुळे आपण सव॔चजण हैराण होत होतो..  काहीनी त्यातून सुटका करून घेण्यासाठी ज्याच्या त्याच्या परीने तात्पुरते प्रयत्नही केले.. परंतु तरीही सध्याची एकूण वाढलेली उष्णता व वाढलेले तापमान याकडे अनेकांनी सर्रासपणे डोळेझाकपणा करून त्यापासून तात्पुरते स्वरूपात सुटका करून घेण्यासाठी ए.सी./पंखे/एअर कुलर्स इत्यादींचा वापर करून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला व केवळ वरवरचा विचार करून तात्पुरते परिणाम अनुकूल करण्यासाठी सर्वच प्रयत्नशील होते.
परंतु याच्या मूळ कारणाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतेयं..याची खंत व सल बोचत राहतेयं...
सध्याचे तापमान हे काही अचानकपणे वाढलेले नाही. तर ते  वातावरणातील झालेल्या सततच्या बदलांमुळे घडते आहे.. आणि हे बदल जर असेच होत राहिले तर कालांतराने तापमानाची वाढ एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल की सजीवसृष्टीचे अतोनात नुकसान व हालअपेष्टा होतील.. आता बदलत्या वातावरणाची सर्वांनी दखल घेऊन त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे योग्य राहील व ते क्रमप्राप्तच आहे..
वास्तविक मागील काही दशकांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात अतोनात अशी वृक्षतोड झाल्याने व नैसर्गिक जंगलसंपत्ती नष्ट होवून त्याद्वारे अनेक जैवविविधता संपुष्टात येत असल्याने, तसेच  रासायनिक उद्योगधंदे, सिमेंटची निर्माण झालेली जंगले, किंवा खूप मोठ्या प्रमाणात होणारे काब॔नडायऑक्साईडचे ऊत्सज॔नामुळे ओझोनच्या नैसर्गिक स्तरावर घातक परिणाम होत आहेत. व ही बाब किती गंभीर व भयावह होवू शकते याचा सारासार जाणीवपुव॔क विचार होताना दिसत नाही. ओझोनचा बिघडत चाललेला समतोल व त्यामुळे सुय॔पासून निघणारी घातक व अतिनील किरणे इत्यादीमुळे पृथ्वीवरील एकंदरीत सरासरीचे तापमानात वाढ झाली आहे.. मागील दशकातील कमाल 35-36 असणारे तापमान आता किमान 38-40 च्या घरात पोहोचले आहे. म्हणजे साधारणतः 3-4 इतका फरक वाढला असल्याचे जाणवते..  म्हणजे याच प्रमाणात तापमान वाढ होत राहीली तर येणाऱ्या दशकात किती गंभीर परिस्थिती निर्माण होईल ... याचा विचार करूनही अंगावर शहारा येईल.. 

आता ही बदललेली नैसर्गिक परिस्थिती एका दिवसात बदलणे कदापि शक्य नाही.परंतु त्यात वेगाने होणारी वाढ नियंत्रणात आणून पुनश्च हळूहळू पूर्वपदावर आणणे शक्य आहे.. परंतु यासाठी आपणा सर्वांना अतिशय प्रामाणिकपणे व वास्तविक कृती करून शासन व सामान्य नागरीक या दोघांच्याही कृतीतून एक दिघ॔काळ चालणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करणे ही सध्याची खरी गरज आहे..व यातूनच पुढच्या पिढीचे अस्तित्व अवलंबून आहे.. याचा आता सर्वानीच विचार करून प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आता आलेली आहे...
त्यासाठी शासकीय स्तरांतून काही ठोस निर्णय घेवून यासंबंधीचे काही महत्वाचे कायदे करणे एखादा कृतिशील कार्यक्रम तयार करून त्याप्रमाणे दिघ॔काळ वाटचाल करावी लागेल... 
नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय मात्र हे शक्य नाही...
नागरिकांच्या सहभागासाठी शासन, विविध संस्था, शासकीय निमशासकीय संस्था, वनविभाग, पय॔टनविभाग, पाटबंधारे विभाग बांधकाम विभाग या व इतर अनेक विभागांनी योग्य तो आपसांतील समन्वय साधून कामे केल्यास तो नक्कीच यशस्वी होवू शकेल... यासाठी गरज आहे ती केवळ शासकीय यंत्रणा विविध विभाग यांचा पुरेसा समन्वय व खुप मोठ्या प्रमाणातील नागरिकांच्या सहभागाची...
यासाठी शासकीय स्तरावरून नागरिकांसाठी विविध बक्षिसे, पुरस्कार, सन्मानपत्र, नोकरी , शाळा कॉलेजेस किंवा इतर अनेकठिकाणी  एक विशिष्ट विशेष गुणवत्ता म्हणून काही विशेष सवलती इत्यादीची जोड देऊन नागरिकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देता येवू शकते..
निसर्ग संवध॔न करून त्यास परस्परपूरक अशाच पध्दतीने विकासकामे करून निसर्गाचा समतोल ढासळू न देता विविध प्रकल्प व योजनांची अंमलबजावणी करून अपेक्षित विकास साधणे ही काळाची खरी गरज बनली आहे...
तर त्यासाठी शासन, नागरिक, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी , शासकीय यंत्रणा, विविध संस्था, संघटना, विविध ग्रुप .मंडळे अशा जवळपास सर्वच स्तरातून निसग॔संवध॔न , वृक्षलागवड होणे खूप महत्वाचे आहे.व त्यातही प्रत्यक्ष कृती होणेही अत्यंत महत्त्वाचे ठरेल. प्रत्येक नागरिकाने केवळ किमान 10-12 वृक्षांची लागवड करून त्यांची पुढील 4-5 वर्षे व्यवस्थित देखभाल करून किंबहुना वृक्षांची पोटच्या मुलांप्रमाणे संगोपन केले तर येणार्‍या पुढील आठदहा वर्षात वृक्षसंख्येत खुप मोठा बदल घडेल यात तिळमात्र शंका नाही...
आपण वृक्ष लागवड करून त्यांची चांगली जोपासना केल्यास , सध्याचा निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल पुनश्च पुव॔वत होईल... व सर्वानाच पुन्हा सुगीचे दिवस येतील...
निसर्ग खुप बलवान व महान आहे.. केवळ अतिशय अवाजवी मानवी हस्तक्षेपामुळे  निसर्गाला थोडीशी ग्लानी आली आहे.. आपण फक्त वृक्षलागवड व वृक्षजोपासना केल्यास निसर्गाला पुनः नवसंजीवनी मिळेल व त्यातून तो पुनः बलशाली होवून स्वतः निसर्ग स्वतःची झालेली झीज व हानी भरून काढेन..
तर चला निसग॔राजाचे हात बलशाली करण्यासाठी व आपल्या पुढील अनेक पिढीला किंबहुना संपूर्ण सजीवसृष्टीचे प्राण वाचविण्यासाठी एकत्र होवूया... व आपल्या निसर्गराजाला बलशाली बनवू या....निसर्ग वाचला तरच मानव वाचेल याचे भान ठेवून कामाला लागूया..  व निसग॔संवध॔न करून पुनश्च नवचैतन्य निर्माण करूया....
पै.श्री अभिजीत विनायक भालेराव 
कोंढवा बुद्रूक, पुणे मो.9822788172

    Post Views:  285


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व