अकोला : स्थानिक श्री.शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थीनी आणि अकोला पुण्यनगरी कार्यालयाचे कर्मचारी मनोहर शामराव मानकर यांची सुकन्या कुमारी नेहा मानकर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून दुसरी आली आहे. विद्यापीठाने नुकताच जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीतील 80 विद्यार्थ्यांच्या यादीत तिचा समावेश आहे.
स्थानिक श्री.शिवाजी महाविद्यालयाच्या मानस शास्त्रतून पद्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या नेहा मानकर हिने विद्यापीठाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत 9.20 गुणानुक्र मांकाची श्रेणी मिळवित विद्यापीठातून द्वितीय आणि महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. अमरावतीची विद्यार्थीनी शालिनी प्रकाश मोटवानी ही विद्यापीठातून सर्वप्रथम आली आहे. मानसशास्त्रातील तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले त्या तिघांमध्ये अकोल्याच्या एकमेव नेहाचा समावेश आहे. अमरावती विद्यापीठाने जाहीर केलेल्या 80 गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीपैकी 57 ह्या विद्यार्थीनी आहेत. दिवसंेदिवस गुणवत्ता यादीतील मुलांचा टक्का कमी होत असल्याचे चित्र आहे.मानस शास्त्रात भरघोष गुण घेवून पदवी आणि पद्युत्तर होणाऱ्या नेहाचे महाविद्यालयाकडून, आणि मित्रमंडळीकडून कौतुक होत आहे.तिने आपल्या यशाचे श्रेय श्री.शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास कुलट, प्रा.डॉ.संतोष पस्तापुरे, प्रा.डॉ.आनंद काळे, आई-वडील आणि घरातील थोरमंडळींना दिले आहे.
Post Views: 245