सेपक टकारा स्पर्धेमध्ये प्रभातची चमू विभागस्तरावर


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Aug 2024, 8:39 PM
   

अकोला ः प्रभात किड्स स्कूलच्या 14 वर्षाआतील गट जिल्हास्तरीय सेपक टकारा या स्पर्धेत उत्कृष्ट यश प्राप्त केल्याने त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनायलय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकूल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सेपक टकारा स्पर्धेचे आयोजन वसंत देसाई स्टेडीयम, अकोला येथे दि. 24 ऑगस्ट 2024 दरम्यान करण्यात आले होते.
जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये 14 वर्षाआतील मुलांमध्ये अहील शेख, तनीश कोरडे, मयुरेश हगवणे, ओजस शिंदे, आराध्य गवळी तसेच 14 वर्षाआतील मुलींमध्ये ईशीका झांबरे, गार्गी राऊत, तन्वी मेहरे, विधी देहलीवाले व भक्ती डिक्कर या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादीत केल्याने त्यांची विभागीयस्तरावर निवड करण्यात आली.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक वैभव देहलीवाले ह्यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वयक मो. आसिफ व क्रीडा विभागप्रमुख संतोष लोमटे यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले असून पुढील विभागीय स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.  

    Post Views:  83


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व