संग्रामपूर तालुक्यातील पुरग्रस्तांना युवा मराठा महासंघाकडून जीवनावश्यक कीटस् चे वाटप !


ज्ञानेश्वर दांदळे,स्वप्निल देशमुख आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने युवा मराठाचे मदत अभियान यशस्वी...!
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  10 Aug 2023, 2:44 PM
   

बुलढाणा - युवा मराठा वृतपत्र समूह आणि युवा मराठा महासंघाने बातम्यांमधून जनजागृतीच्या पलिकडे कृतिशील उपक्रम राबविले आहेत. महाराष्ट्रातील संकटाच्या परिस्थितीत  माणूसकीच्या भावनेतून म्हणून युवा मराठा महासंघ सेवादूत म्हणून मदतीसाठी वेळोवेळी पुढे आलेला आहे.यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली भागात आलेल्या महापुरामुळे उध्वस्त झालेल्या रहिवाश्यांना युवा मराठाने प्रत्यक्ष भेट देऊन सुमारे दोन लाख रुपयांची जीवनाश्यक साहित्याची  मदत केलेली आहे.तर रत्नागिरीच्या चिपळूण भागातही सहकार्य करण्यात युवा मराठा आघाडीवर होता.
     यावर्षीच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात  अतिवृष्टीने नदी नाल्यांना आलेल्या पुराने नदीकाठच्या लोकांचे फार मोठे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किचन किट चे वितरण युवा मराठा महासंघाकडून ८ ऑगस्ट रोजी  करण्यात आले. यावेळी तालुक्यातील बऱ्याच पूरग्रस्त गावांमध्ये ह्या किट वितरित करण्यात आल्यात.  वरवट बकाल येथील  वितरण अभियानात  येथील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे मनार्डी, उकडगाव येथे ही जीवनावश्यक किचन किट वितरण करतेवेळी तेथील सरपंच व नागरिकांनी सहकार्य केले.    
            तामगाव पोलीस स्टेशनचे  ठाणेदार  उलेमाले यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरणाला सुरुवात करण्यात आली, त्यांनी युवा मराठा महासंघ कडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची कौतुक करीत "मानव सेवा हीच ईश्वर सेवा" म्हणून युवा मराठा महासंघाला पोलीस स्टेशन तामगाव कडून सुद्धा सहकार्य मिळाले. जिल्हाभर डोळ्यांच्या आजाराची साथ चालू असल्याने  वितरण करतेवेळी आजआरग्रस्त नागरिकांना  डोळ्यांचे ड्रॉप देण्यात आलेत.  वरवट बकाल येथील डॉ. विवेक देशमुख, तालुकाआरोग्य अधिकारी डॉ. मारोडे , व वानखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.कड यांच्याकडून सहकार्य लाभले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्न करणारे युवा मराठा महासंघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे,  ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उमाताई बोचरे तसेच  व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते गणेशभाऊ गांधी, जयेश दातार यांची आणि नागरिकांची महत्वपुर्ण उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील आणि  वानखेड येथील बहूतांश नागरीकांकडून योगदान मिळाले.यासाठी गत पंधरा दिवसापासून युवा मराठा न्युजचे बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ स्वप्नील (बापू) देशमुख हे प्रयत्नशील होते.त्यांनी विविध स्तरावरुन आर्थिक मदती जमा करुन हे मदत अभियान यशस्वी केले.

    Post Views:  150


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख