फेब्रुवारी महिन्यात 13 दिवस सुट्ट्यांमुळे बॅंका बंद राहणार......


 संजय देशमुख  2022-02-02
   

नवी दिल्ली : या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 22 मध्ये 13 दिवस सरकारी आणि खासगी बॅंकांमध्ये कोणतंही कामकाज होणार नाही. रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार फेब्रुवारी महिन्यात 13 दिवस सुट्ट्यांमुळे बॅंका बंद राहणार आहेत. त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये कामगार संघटनांनी दोन दिवस संपाचीही हाक दिली आहे. फेब्रुवारीमध्ये, बँकांच्या एकूण 13 दिवसांच्या सुट्ट्यांपैकी चार सुट्ट्या या रविवारच्या आहेत. यातील काही सुट्ट्या या जोडून आलेल्या आहेत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या सुट्टयांच्या यादीनुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांसाठी आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांना एकाच वेळी लागू होणार नाहीत. तसेच आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बॅंका बंद असतात.
ज्या ग्राहकांना कामासाठी प्रत्यक्ष बॅंकेत जावं लागतं, अशा ग्राहकांना बँकेचं कामकाज बंद राहिल्यास सर्वाधिक फटका बसतो. तथापि, वीकेंडला ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहत असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळतो. आरबीआयने अलीकडेच लागू केलेल्या नवीन नियमांमुळे एनईएफटी आणि अन्य पैसे ट्रान्सफर करण्याची ऑनलाइन चॅनेल सुट्टीच्या दिवशीही सुरू राहत असल्याने ग्राहकांना याचा फायदा होतो.

    Post Views:  238


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व