जनहितार्थ बातमी प्रकाशित केल्याने पत्रकारावर प्राणघातक हमला
प्रकृती ठीक नसल्यान फिर्याद देणे झाले नाही
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
26 Jun 2023, 5:41 PM
वाशिम - जिल्ह्यातील बांधकामाविषयी जनहितार्थ बातमी प्रकाशित केल्याने एका पत्रकारावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिनांक 23 जून रोजी सकाळी 1 :30 वाजताच्या दरम्यान पुरोहित पेट्रोल पंप सेलू फाटा मालेगांव येथे घडली आहे.
वाशिम जिल्ह्यात बांधकाम गैरव्यवहार खाते प्रमुख यांना लक्ष देण्याची गरज या मथळ्याखाली दिनांक 22 जून रोजी जनहितार्थ काम न करता कामाला लागणाऱ्या मटेरियल चे बिल काढण्यात येत असल्याने नागरिकांची दिशाभूल होत असल्याने हा गैरव्यवहार थांबवण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली गेली असल्याने बातमी प्रकाशित केली होती याची संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी व संबंधित ठेकेदार यांना झळ लागल्याने गावाकडची बातमीचे वाशिम जिल्हा प्रसिद्ध प्रतिनिधी कैलास बनसोड यांच्यावर सुपारी घेऊन मालेगाव येथील गाव गुंडांनी प्राणघातक हल्ला केला यात ते जखमी झाले असून शासकीय रूग्णालय वाशिम येथे उपचार सुरू आहेत.
याबाबत बनसोड यांनी संबंधित मालेगाव पोलीस स्टेशनला फिर्याद देनेकरिता गेले असताना त्याच्या डोक्यातमार असल्याने त्यांना चकार येत होती व मनस्थिती ठीक नसल्याने फिर्याद जबानी रिपोर्ट देऊशकले नाही असे समजून येते. हमला करणाऱ्या विरुद्ध तक्रार दिली नाही .पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले नाहीत. पुढील तपास संबंधित मालेगाव पोलीस स्टेशन कारवाई आहे उपचारासाठी बनसोड यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे वारंवार पत्रकारांवर हल्ला होत असल्याने गावाकडची बातमी च्या कडून संबंधित घटनेचा वतीने निषेध नोंदविण्यात येत असून संबंधितावर कठोर कारवाई होण्याची मागणी होत आहे..
Post Views: 104